लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या विशेष पथकाने अवघ्या महिनाभरात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करुन महिनाभरातच एक कोटीहून अधिक माल जप्त केला आहे.जिल्ह्यातून होणारी अवैध दारूची वाहतूक, कत्तलखाण्यात नेले जाणारे जनावरे व सट्टापट्टी यांच्यावर लगाम लावण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी विशेष पथक तयार केले. पोलीस अधिक्षकांनी ज्या उद्देशातून हे पथक उभारले त्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांच्या कसोटीवर खरे उतरण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या कारवाईत ५ सप्टेंबर ते १२ आॅक्टोबर या दरम्यान एक कोटी एक लाख १६ हजार ८६० रूपयाचा माल जप्त करण्यात आला.विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक महेंद्र शहारे,पोलीस हवालदार घनश्याम थेर, सोमेंद्रसिंह तुरकर, बिजेंद्र बिसेन, चेतन पटले, उमेश कावळे, अजय बोपचे, पंकज रहांगडाले, सुलोचना मेश्राम, कैलाश कुरसुंगे यांनी ही कारवाई केली.लाखाहून अधिकचे पुरस्कारपोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने महिनाभरात अवैध व्यावसायीकांची नाडी कसल्यामुळे त्यांना कारवाई केल्याचे बक्षीस म्हणून पोलीस अधिक्षकांनी २ लाख रूपयाहून अधिकचे बक्षीस बहाल केले आहे. या बक्षीसामुळे जिल्ह्यातील पोलीस चांगली कामगीरी करण्यासाठी प्रोत्साहित होत आहे.
महिनाभरात एक कोटीचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:47 AM