त्यामध्ये सलोनी विलास टेंभरे हिने ९८.२० टक्के गुण प्राप्त करून प्रथम, प्रणाली धोंडू बिसेन हिने ९८ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय, जयश्री शिलिकराम रहांगडाले यांनी ९७ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त ६२ विद्यार्थी असून, प्रावीण्य श्रेणीत ५०, तर प्रथम श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा प्राचार्य ए.डी. पटले व पर्यवेक्षक व्ही.व्ही. मेश्राम यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जी.एन. बिसेन, एस.पी. भगत, एम.एम. अंबादे, डी.एस. बोदेले, विजय खोब्रागडे, डी.आर. गिरीपुंजे, आर.बी. भांडारकर, आर.के. किरसान, ए.बी. राठोड, बिसेन, व्ही.एच. जनबंधू, झेड.जे. भोयर, के.पी. उके, अरविंद टेंभेकर, बी.पी. भारतकर, अरुण मेश्राम, विनोद धावडे, संगीता वालदे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
भिवरामजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:19 AM