विज्ञान शाखेत ओजस बापूरे याने ९०.२० टक्के गुण घेऊन प्रथम, राजेंद्र चिचले याने ८९.८० टक्के गुण घेऊन व्दितीय व विश्वजितसिंघ धुर्वे याने ८३.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. वाणिज्य शाखेत अभयराजसिंग बोपचे याने ८८ टक्के गुण घेऊन प्रथम, शैलजा जोशी हिने ८७.४० टक्के गुण घेऊन व्दितीय व व्टिंकल सोनेकर हिने ८६.८० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. सब्जेक्ट टॉपर्समध्ये इंग्रजीत शैलजा जोशी हिने ९६ टक्के, भौतिकशास्त्रात ओजस बापूरे याने ८६ टक्के, रसायन शास्त्रात ९३ टक्के व जीवशास्त्रात ९९ टक्के, गणितात बादलसिंग दशमेर याने ६३ टक्के, जीवशास्त्रात राजेंद्र चितळे याने ९९ टक्के, अर्थशास्त्रात अभयराजसिंग बोपचे याने ८६ टक्के, वाणिज्यशास्त्रात ९० टक्के, संगणक शास्त्रात ९७ टक्के, लेखाविषयात अक्षय बघेले याने ८७ टक्के आणि शारीरिक शिक्षणात शैलजा जोशी हिने ९८ टक्के गुण घेतले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकाक ईरा शर्मा यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
दिल्ली पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:26 AM