लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकस्तर वेतन श्रेणी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क.मडावी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेकडून त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.चर्चेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी मडावी यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी एकस्तर नुसार पगार बिल पाठवले तर आम्ही मंजूरच करणार असे सुचिवले. तसेच ग्रामविकास विभागाच्या ११ डिसेंबर २०१३ च्या पत्रावर पुढील सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढू असे सांगितले. तर शिक्षणाधिकारी नरड यांनी, वित्त विभागाकडून सोमवारी मार्गदर्शन मागविणार व येत्या काही दिवसात एकस्तर १०० टक्के मंजूर होणारच असे सांगितले.दरम्यान, संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी नरड यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. चर्चेला जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज कडव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
एकस्तर वेतनश्रेणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 9:46 PM
एकस्तर वेतन श्रेणी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी अ.क.मडावी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेकडून त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटना : लेखा व शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा