शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत एक जण बुडाला, निमगाव येथील घटना

By अंकुश गुंडावार | Published: June 18, 2024 9:17 PM

बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु

अर्जुनी मोरगाव : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पडलेली मोटार बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेला एक व्यक्ती विहिरीत बुडाल्याची घटना मंगळवारी (दि.१८) दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील निमगाव येथे घडली. माधो सोविंदा मेश्राम (५०) रा. बोंडगावदेवी असे विहिरीत बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुडालेल्या व्यक्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अग्निश्मन दलाला पाचारण करुन विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील तलावात पाणी पुरवठा योजेनेच्या विहिरीचे बांधकाम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंगळवारी विहिरीतील पाण्यात मोटार पडली. विहिरीत जवळपास २५ फूट पाणी असल्याने कंत्राटदाराने या कामात पारंगत असलेल्या बोंडगावदेवी येथील माधो मेश्राम या व्यक्तीला मोटार काढण्यासाठी बोलाविले. माधो मेश्राम आणि त्याचा सोबती दागो मानकर हे मंगळवारी दुपारी निमगाव येथे पोहचले. यानंतर दोघेही घटनास्थळी पोहचल्यानंतर माधो मेश्राम हा विहिरीत मोटार काढण्यासाठी उतरला तर त्याच्यासोबत असलेला दागो मानकर हा विहिरीच्या बाहेर होता.

दरम्यान माधोला पाण्याचा अंदाज न आल्याने तो विहिरीत बुडाला. दरम्यान दागो मानकर याने या घटनेची माहिती कंत्राटदार विहिरीचे काम करीत असलेल्या मजुरांना दिली. सर्वांनी विहिरीकडे धाव घेत माधोला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण विहिरीत जवळपास २५ फूट पाणी असल्याने माधोला विहिरीतून बाहेर काढण्याची अडचण निर्माण झाली. दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करुन विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले. वृत्तलिहेपर्यंत विहिरीतून पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरुच होते.

माधो होता या कामात पारंगतबोंडगावदेवी येथील माधो मेश्राम हा व्यक्ती विहिरीत उतरण्यासाठी व तसेच विहिरीत पडलेल्या मोटार बाहेर काढण्याच्या कामात अत्यंत पारांगत होता. त्यामुळे तालुक्यात असे कुठलेही काम असल्यास त्याला बोलविले जात आहे. पण मंगळवारी तो पारंगत असलेल्या कामानेच त्याचा घात केला. या घटनेमुळे माधो मेश्राम याच्या कुटुंबावर दुख:चे डोंगर कोसळले आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेgondiya-acगोंदिया