लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यातील शेतकºयांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी. शेतमाल विक्री करताना दलालांची मध्यस्थी बाजूला सारून शेतकºयांना त्यांचा शेतमालाची कुठेही विकण्याची मुभा मिळण्यासाठी अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यातर्फे राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेंतर्गत आॅनलाईन धान खरेदीला बाजार समितीच्या मुख्य यार्डात सुरूवात करण्यात आली.प्रथमच करण्यात आलेल्या धान खरेदीच्या आॅनलाईन लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती काशिफजमा कुरैशी यांच्या हस्ते उपसभापती लायकराम भेंडारकर व परवानाधारक व्यापाºयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तावशी (खुर्द) येथील गणेश अॅग्रो इंडस्ट्रीजने शुभारंभाप्रसंगी ४५ क्विंटल धान आॅनलाईन पध्दतीने खरेदी केले.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील एकमेव अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, तालुका सहायक निबंधक भानारकर, बाजार समितीचे प्रभारी सचिव अशोक काळबांधे, मंडी अॅनालिस्ट रंगनाथ कटरे यांच्या उपस्थितीत शेतकरी, व्यापारी, अडते यांची दोनदा कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.केंद्र शासनाची राष्ट्रीय कृषी बाजार ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे.ही योजना राबविण्यासाठी शासनातर्फे पायाभूत सुविधांसाठी १० संगणक संच, १० युपीएस, १ एलईडी, ४ प्रिंटर, २ टॅब, १ वेब कॅमेरा इत्यादी साहित्य बाजार समितीला उपलब्ध करुन देण्यात आले.आॅनलाईन मिळणार सौदा पट्टीयापुढे मार्केट यार्डमधील धानाचा लिलाव, मालाची नोंदणी, सौदा पट्टी ई-नाम प्रणालीद्वारे प्राप्त होणार आहे. यामध्ये अडते, व्यापाºयांनी सहभागी व्हावे, शेतमालाचे ग्रेडींग करुन अपलोड केले जाणार आहे. सदर व्यवहारामध्ये पारदर्शकता व शेतमालाला चांगला भाव मिळावा हा एकमेव उद्देश आहे.आधारकार्ड व बँक पासबुक आवश्यकशेतमालविक्रीस आणताना प्रवेश द्वारावर नोंदणी करण्याकरीता बँक पासबुक व आधारकार्डची सत्यप्रत सोबत आणून आॅनलाईन लिलाव पध्दतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सभापती कुरैशी व सचिव काळबांधे यांनी केले आहे.
आॅनलाईन लिलाव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:28 PM
तालुक्यातील शेतकºयांना शेतमालाची योग्य किंमत मिळावी. शेतमाल विक्री करताना दलालांची मध्यस्थी बाजूला सारून.....
ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम : ई-नाम योजनेंतर्गत ४५ क्विंटल धान खरेदी