शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

तलावांत केवळ १०.२८ टक्के पाणी

By admin | Published: April 18, 2015 12:41 AM

जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. ..

पाणीसाठ्यात घट : मागील वर्षी होते ३२.१६ टक्के पाणीगोंदिया : जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. मागील एक ते दोन आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस येत आहे. तरीही जलाशय-तलावांतील पाण्याचे स्तर एवढे कमी झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आजच्या तारखेत ३२.१६ टक्के जलसंग्रह होते.जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चार जलाशयांतही पाणी संग्रहाची स्थिती बिकट आहे. कालीसरार जलाशय तर अनेक महिन्यांपूर्वीच आटले आहे. इटियाडोह जलाशयात २७.४४ टक्के, सिरपूर जलाशयात १८.९३ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के जलसंग्रहाची स्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या तलावांपैकी तीन तलावांची स्थिती गंभीर आहे. त्यांत एक टक्कासुद्धा पाणी उरले नाही. मध्यम प्रकल्पाच्या बोदलकसा जलाशयात ५.५३ टक्के, चोरखमारा जलाशयात ०.८७ टक्के, चुलबंदमध्ये ६.४० टक्के, खळबंदामध्ये १०.६३ टक्के, मानागडमध्ये ११.७४ टक्के, रेंगेपारमध्ये ०.२८ टक्के, संग्रामपूरमध्ये पाणी लघुत्तम पातळीच्या खाली आहे. मध्यम प्रकल्पाच्या सात तलावांत पाण्याचा साठा केवळ ५.६१ टक्के आहे. उमरझरी येथे १७.४४ टक्के, कटंगी येथे १७.९५ टक्के, कलपाथरी येथे १६.९७ टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. लघू प्रकल्पाच्या १९ तलावांत एकूण १३.५१ टक्के पाणी उरले आहे. आक्टीटोला येथे १०.०१ टक्के, भदभद्या येथे १४.०१ टक्के, डोंगरगाव येथे १.९८ टक्के, कालीमाटी येथे २.१५ टक्के, मोगर्रा २७.४६ टक्के, नवेगावबांध १९.३० टक्के, पिपरिया २२.६५ टक्के, पांगडी ०.८९ टक्के, रेहाडी १४.४३ टक्के, राजोली १०.८६ टक्के, रिसाला २.२२ टक्के, सोनेगाव १.६८ टक्के, सालेगाव ९.७५ टक्के, शेरपार ७.०७ टक्के, जुनेवानी ११.६३ टक्के, गुमडोह, हरी, शेळेपार व वडेगाव येथील तलावांत पाण्याची टक्केवारी लघुत्तम स्तरापर्यंत पोहोचली आहे. ओवारा तलावात १६.९८ टक्के पाणी उरले आहे. जुन्या मालगुजारी तलावात फुलचूर ६.४७, गोठणगाव १२.७५, गिरोला ४.२७, गंगेझरी ६.००, कवठा २०.४५, कोहलगाव १८.९०, खैरी ०.९७, खमारी १०.३५, कोसमतोंडी ११.९५, कोकणा १६.९६, खोडशिवनी ९.००, खाडीपार ०.६३, लेंडेझरी १९.०५, माहुली १.६१, मालीजुंगा १.८२, मेंढा ६.५३, मोरगाव ४.४४, माहुरकुडा ९५.१०, निमगाव ३.३४, नांदलपार ११.८१, पळसगाव (सौंदड) ६.२२, पुतळी ४७.७८, सौंदड तलावात ३१.११ टक्के पाणी उरले आहे. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाळी, धाबेटेकडी, कोसबी-बकी, ककोडी, काटी, मुंडीपार, पालडोंगरी, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव येथे जलसाठा लघुत्तम स्तरापेक्षा खाली गेला आहे. स्थानिक पातळीवरील छत्तरटोला, सालेकसा (नर्सरी) व चारभाटा येथेसुध्दा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत पाणी समाप्त झाले आहे. (प्रतिनिधी)