शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
3
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
4
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
5
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
7
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
8
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
9
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
10
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
11
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
12
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
13
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
14
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
15
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
16
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
17
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
18
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
19
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
20
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा

पाच वर्षात अवघी ३३० रुपये भाववाढ

By admin | Published: June 20, 2015 1:32 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने

गोंदिया : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची आणि शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त हमीभाव देण्याची ग्वाही देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षात धानाला ३३० रुपये भाववाढ मिळाली असून त्यात गेल्या दोन वर्षात सर्वात कमी भाववाढ मिळाल्याचे दिसून येते.एकीकडे उत्पादनाचा खर्च वाढत आहे. बियाणे, कीटकनाशकांच्या किमतीसह मजुरीचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत हमीभावात अपेक्षित भाववाढ केल्या जात नाही. केंद्रात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सलग दुसऱ्या वर्षीही धानाला अवघी ५० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना धान उत्पादकांमध्ये निर्माण झाली आहे.पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०११-१२ या हंगामात धानाचे भाव (जनरल ग्रेड) प्रतिक्विंटल १०८० रुपये होते. २०१२-१३ मध्ये त्यात १७० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर २०१३-१४ मध्ये त्यात ६० रुपये प्रतिक्विंटल भाववाढ करण्यात आली. मात्र त्या हंगामात २०० रुपये प्रतिक्विंटल बोनस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आघाडी सरकारचे ते सत्तेतील शेवटचे वर्ष होते. शिवाय नजिकच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या भाजप सरकारांनी शेतकऱ्यांच्या धानाला बोनस जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातही आघाडी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस देऊन शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणा दिसाला दिला होता. मात्र गेल्यावर्षी म्हणजे २०१४-१५ मध्ये सत्ताबदल झाला. भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. हे सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची धानाची पहिलीच भाववाढ त्यांनी अवघी ५० रुपये केली. त्यामुळे धानाला २०१४-१५ या हंगामात १३६० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मात्र शेवटी शेवटी का असेना शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये सानुग्रह मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे गेल्यावर्षीही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असे म्हणता येईल. आता वर्ष २०१५-१६ करिता केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने जाहीर केलेल्या धानाच्या हमीभावात पुन्हा एकदा केवळ ५० रुपये भाववाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्याचे खासदार नाना पटोले यांनीही याबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सांगितले असले तरी धानाला अपेक्षित भाववाढ मिळवून देण्यात त्यांना यश येईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या भाववाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला कोंडीत पकडत ही अल्प भाववाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक होताच याविरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. (जिल्हा प्रतिनिधी)