शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

२० वर्षांत चारच वेळा मानधनात तुटपुंजी वाढ; कधी करणार नियमित? : समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 5:10 PM

शासनाला सवाल : जिल्ह्यातील १४० कंत्राटी कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्व शिक्षा अभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने विविध पदांवर कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर डायट व तालुकास्तरावर मागील १८ ते २० वर्षांपासून कार्यरत आहेत. या २० वर्षांत फक्त चारच वेळा त्यांच्या तुटपुंज्या मानधनात वाढ झाली आहे. एनएचएम कर्मचाऱ्यांना नियमित केले मग आम्हाला का नाही, असा सवाल करीत आम्हाला नियमित करण्यात यावे, अशी मागणी समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांनी केली आहे.

२० वर्षापूर्वी सर्व शिक्षा अभियानात १४ प्रकारच्या पदांची जाहिरात देऊन भरती करण्यात आली होती. त्यात सहायक कार्यक्रम अधिकारी, जिल्हा समन्वयक, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, संगणक प्रोग्रामर, एमआयएस को-ऑर्डिनेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर कम असिस्टंट, वरिष्ठ लेखा लिपिक, विषय साधनव्यक्ती, जिल्हा व समन्वयक (दिव्यांग समावेशित योजना), समावेशित शिक्षण विशेषज्ञ, विशेष शिक्षक, वाहनचालक व परिचर आदी पदांचा समावेश होता. राज्यात अशी एकूण ६०३० पदांची भरती बिंदू नामावलीनुसार ज्याप्रमाणे सरळ सेवा भरतीची जाहिरात देऊन केली जाते, तशीच करण्यात आली होती.

जिल्ह्यात १४० पदे कार्यरत आहेत व त्यापैकी २०१५ पासून विषय साधनव्यक्ती, समावेशित विशेषज्ञ व विशेष शिक्षक हे गुणवत्तेच्या कार्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) वर्ग करण्यात आले आहेत. १८ ते २० वर्षांचा कालावधी होऊनही शासन सेवेत कायम न झाल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात असंतोष वाढत आहे. अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. शासन सेवेत कायम करणे, समान काम समान वेतन देणे, सोबतच शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा अभियानातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे.

समग्र अभियानाचे कर्मचारी करतात हे कामशाळापूर्व तयारी अभियान, प्रश्नपेढी निर्मिती, शिक्षण सप्ताह, महावाचन चळवळ, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश माहिती, शाळाबाह्य सर्वेक्षण, निवडणुकीचे कार्य, विद्याप्रवेश विद्यांजली, विद्या समीक्षा, नवसाक्षर भारत, एनआयएलपी, अध्ययनस्तर निश्चिती, निपुण भारत उपक्रम, जर्मन भाषा कार्यक्रम, सामाजिक, आर्थिक वंचित गट माहिती, आरटीईचे कार्य, एससीईआरटी, डायट, जि. प. शिक्षण विभागाचे विविध गुणवत्तेचे कार्य, पीएमश्री शाळाबाबत कार्य, शाळासिद्धी, पीजीआय, विविध अनुदान वाटपाचे कार्य आदी कामे समग्र शिक्षा कर्मचारी अत्यंत अल्प मानधनावर करतात.

सात वर्षांपासून मानधन वाढ नाहीसन १९९४ मध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सेवा नियमावली तयार करण्यात आली. त्यात १० टक्के मानधन वाढ करण्याचा उल्लेख केला होता; मात्र आतापर्यंत चार वेळा मानधन वाढ केली आहे. २०१७-१८ पासून मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसे चालवत असतील? त्यात मुलांचे शिक्षण, औषधोपचार आदी विविध प्रकारच्या समस्या कायम आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदgondiya-acगोंदिया