लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी शासनाने त्यांच्या हातात केराची टोपली थोपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांचे भवितव्य अंधारात आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे युवक काँग्रेसच्या संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.श्रीे अर्धनारेश्वरालय हलबीटोला सालेकसा येथे तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरत बहेकार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस महासचिव यादनलाल बनोठे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम बनोठे, पं.स.सदस्य भरत लिल्हारे, देवराज मरस्कोल्ह, नगरसेवक क्रिष्णा भैसारे, शामकला प्रधान, मंगला करंडे, गुणाराम मेहर, योगेंद्र फुंडे, दादूलाल परिहार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष उज्वल ठाकूर, तालुकाध्यक्ष हितेश शिवणकर उपस्थित होते. कोरोटे म्हणाले, शासनाने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करीत आहेत. त्यामुळे आजचा सुशिक्षित युवक कामाचा शोधात भटकत आहे. अशा शासनाला सत्तेच्या बाहेर खेचण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन कोरोटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेष बहेकार यांनी मांडले. संचालन सुनील हत्तीमारे यांनी केले तर आभार बाजीराव तरोणे यांनी मानले.
बेरोजगारांच्या हातात केवळ केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:38 AM
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी शासनाने त्यांच्या हातात केराची टोपली थोपविण्याचे काम केले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांचे भवितव्य अंधारात आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : अर्धनारेश्वरालयात युवक काँग्रेस मेळावा