शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

नॅक प्रमाणित महाविद्यालयांनाच मिळणार फ्रीशीप योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 4:51 PM

विनोद मोहतुरे : समाज कल्याण विभागाची योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न २.५ लक्षाच्यावर आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क, परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशीप) योजनेचा लाभ दिला जातो. असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

समाज कल्याण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील महाविद्यालयांना, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद द्वारा प्रमाणपत्र मिळाले असल्यास प्रमाणपत्र कार्यालयात सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने नटवरलाल माणिकलाल दलाल कला आणि वाणिज्य महाविद्यालय गोंदिया, यशवंतराव कला महाविद्यालय महागाव / सिरोली, एस. एस. गर्ल्स महाविद्यालय गोंदिया, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया, भवभूती महाविद्यालय आमगाव, मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सडक अर्जुनी, एम. एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट कुडवा इत्यादी महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारा प्राप्त प्रमाणपत्र कार्यालयामध्ये सादर केलेले आहे. 

समाज कल्याण कार्यालयास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वरील नमूद महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारा प्रमाणक (नॅक) दर्जा प्राप्त आहे. करिता वरील नमूद महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनाच शिक्षण शुल्क, परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ दिला जाईल. विद्यार्थी व पालकांनी प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश घ्यावा. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया