शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

तीन वर्षांत केवळ एकच अपघात

By admin | Published: May 30, 2017 12:56 AM

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागरूकता सप्ताह २९ मे ते २ जून २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

मानवरहीत फाटक : आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागृती सप्ताह सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात आंतरराष्ट्रीय समपार फाटक जागरूकता सप्ताह २९ मे ते २ जून २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या संख्येनुसार रेल्वे फाटकांवर अधिकतर अपघात वाहन चालक व पायी चालणाऱ्यांमुळे होते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत सन २०१४-१५ मध्ये मानवरहीत समपार फाटकावर एक अपघात घडला. परंतु सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये एकही अपघात घडला नाही. दपूम रेल्वे नागपूर मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या विस्तृत कार्ययोजनेंतर्गत नागपूर मंडळांतर्गत नागपूर मंडळाच्या संरक्षण विभागाचे वरिष्ठ मंडळ संरक्षण अधिकारी ए.एम. मसराम यांच्या नेतृत्वात मंडळातील रेल्वे कर्मचारी, भारत स्काऊट व गाईड तसेच नागरिक सुरक्षा संघटनेच्या सहकार्याने २९ मेपासून सतत मंडळाच्या विविध समपार फाटक, बाजार, पेट्रोल पंप, स्थानक, रेल्वे गाड्या व बस स्थानकावर प्रवासी व नागरिकांंना संरक्षणाबाबत जागृत करतील. त्यामुळे अपघातांना पूर्णत: टाळले जावू शकेल तसेच स्वच्छतेच्या बाबतही जागृती करण्यात येणार आहे.रेल्वेचे भारत स्काऊट गाईड, नागरी सुरक्षा संघटन व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे विविध स्थानकांच्या समपार फाटकांवर पॉम्प्लेट्स वितरित करण्यात येतील. नुक्कड नाटकसुद्धा आयोजित करण्यात येत आहेत. शिवाय ग्रामपंचायत, पेट्रोल पंप, बस स्थानक, बाजार, चौरस्त्यांवर जागृतीसाठी पॉम्प्लेट्स वितरित करण्यात येतील. रेडिओ, टीव्ही, लोकल चॅनल व उद्घोषणा प्रणालीचा उपयोग करून प्रवाशांमध्ये संरक्षणाप्रति जागरूकता करण्यात येईल. त्यामुळे समपारवर होणाऱ्या अपघातांना पूर्णत: समाप्त करण्यासाठी सर्व प्रयत्न होवू शकेल.जिल्ह्यात मानवरहीत समपार फाटकांची संख्या अधिक आहे. या फाटकांवर अपघात होवू नये, याच प्रमुख उद्देशाने सदर जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.