लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामनगरवासीयांनी दिला. तसेच मागील चार दिवसांपासून जंगलातच आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१) आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे बोलविण्यात आले होते. मात्र तिथे सुध्दा ठोस नव्हे तर तोंडी आश्वासन मिळाले. त्यामुळे पाचव्या दिवशी श्रीरामनगरवासीयांचे आंदोलन सुरूच होते. पूर्वाश्रमीच्या कलवेवाडा, झंकारगोंदी, कालीमाती येथील गावकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह सोमवारपासून (दि.२५) गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील जंगलातच आंदोलन सुरू केले आहे. श्रीरामनगरवासीयांनी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन न देण्यात आल्याने आपल्या पूर्वीच्या कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावात जावून राहण्याचा इशारा देत सोमवारी (दि.२५) गावांच्या दिशेने कुच केली. मात्र वनविभागाने गावकऱ्यांचा संताप लक्षात घेत गावाकडे जाणाºया जंगलातील प्रवेशव्दारावर ताराचे कुंपण करुन गावकºयांना रोखून धरले, त्यामुळे श्रीरामनगरवासीयांनी सुध्दा माघार न घेता जंगलातील या मार्गावरच आपला मुक्काम ठोकला. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच मागील चार दिवसांपासून जंगलातच आपल्या मुलाबाळांसह मुक्काम ठोकला. जवळपास सहाशे गावकरी याच ठिकाणी तळ ठोकून आहेत. तिथेच स्वयंपाक तयार करीत असून याच ठिकाणी झोपत आहे.दरम्यान शुक्रवारी त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांना मुंबई येथे चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. मात्र या चर्चेत सुध्दा केवळ तोंडी आश्वासन मिळाल्याने शिष्टमंडळाला रिकाम्या हातानेच परतावे लागेल.चर्चेसाठी गेलेले शिष्टमंडळ परत आल्यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मुंबईत मिळाले केवळ तोंडी आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 1:02 AM
तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामनगरवासीयांनी दिला.
ठळक मुद्देजुन्या गावात परतण्याचा इशारा : श्रीरामनगरवासीयांचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच