शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन ‘मुस्कान-२’

By admin | Published: December 30, 2015 2:19 AM

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभाग आता आॅपरेशन ‘मुस्कान-२’ राबविणार आहे.

नरेश रहिले गोंदियाबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभाग आता आॅपरेशन ‘मुस्कान-२’ राबविणार आहे. नववर्षात १ ते ३१ जानेवारी या काळात हे आॅपरेशन राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात राबविण्यात आलेले आॅपरेशन मुस्कान यशस्वी झाल्यामुळे गृह मंत्रालयाच्या आदेशावरून हा दुसरा टप्पा राबविला जाणार आहे. हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आॅपरेशन ‘मुस्कान’ जुलै महिन्यात राबविण्यात आले. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ३० जून २०१५ या काळात बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध या मोहिमेत घेण्यात आला. या काळात २४७ मुले व ५११ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यातील काहींचा शोध लागला तर काही स्वत:हून घरी परतले. त्यातूनच आॅपरेशन मुस्कानने केलेल्या कार्यात ३१ बालकांना पकडण्यात आले. मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. १८ वर्षाखाली बेपत्ता किंवा अपहरणाचे प्रमाण पाहून राज्यशासनाने या बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली होती. या मोहीमेला गोंदिया जिल्ह्यात भरभरून यश आले. अख्या महाराष्ट्रात या आॅपरेशन मुस्कानला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे या आॅपरेशमध्ये न मिळालेल्या बालकांसाठी व या अभियानानंतर हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन ‘मुस्कान-२’ मोहीम राबविण्यात येणार आहे. आॅपरेशन ‘मुस्कान-२’ हे अभियान राबविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी लावण्यात येणार आहेत. यांतर्गत बसस्थानके, रूग्णालय, उद्यान, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क साधला जाणार आहे.सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावाया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई वडीलांच्या स्वाधीन करणे, आई वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलिस करतात. समितीने त्या बालकांना बालसुधारगृहात पाठविण्याचे सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना सोडून देतात. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा व ही बालके शोधण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. २६ बालके अद्याप बेपत्ता १ ते ३१ जुलै या महिन्यात बेपत्ता असलेल्या ३१ बालकांना आॅपरेशन मुस्कान दरम्यान शोधून काढले होते. यातील ७ मुले व १६ मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर ७ मुले व एका मुलीला बालक समिती समोर सादर करण्यात आले. अशा एकूण ३१ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २३९ मुले व ४९३ मुली पोलिसांना मिळाल्या आहेत. आताही गोंदिया जिल्ह्यातील २६ बालके बेपत्ता असून यात ८ मुले व १८ मुलींचा समावेश आहे.मुख्य प्रवाहात आणणारज्या बालकांना आॅपरेशन मुस्कानच्या माध्यामातून पकडण्यात येते त्या बालकांचे मातापिता नसल्यास त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची व झोपण्याची सोय शासन करणार आहे. पोलिसांनी त्या बालकांना पकडून मातापिता मिळाले तर त्यांना बालसुधार पाठविणार आहेत. त्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.