देवरी : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर २०१५ रोजी एक परिपत्रक काढून आदिवासीच्या यादीमधील १७ जाती-जमातींचे मानववंश शास्त्रीय दृष्टीकोणातून सर्वेक्षण व अभ्यासातून कंवर जमातीला वगळण्यात यावे या मागणीला धरुन धमदीटोला येथील कवर समाज संघटनेच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार डी.के. गुरनुले यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले आहे. निवेदनानुसार, संविधानात १९५० मध्येच अनुसूचित जमातीमधील ४७ जमातीचे सर्वेक्षण करुन अनुसूचित जमातीच्या सुचित कवंर जमातीचा अनु. क्र. २२ वर नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा १७ जमातीचे सर्वेक्षण व अभ्यास करण्यामागचा शासनाचा उद्देश काय? यात साध्याभोळ्या खऱ्या आदिवासींना वगळून धनाढ्य व बोगस जातींना समाविष्ट करण्याचा षडयंत्र तर नाही ना, असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व कवर समाजबांधवांनी केला आहे. या सर्वेक्षण व अभ्यासाचा विरोध करण्याकरिता गुरूवारी नागपूर विधीमंडळावर आदिवासी समाजबांधवाच्या मोर्चात जास्तीत जास्त कवर समाजबांधवांनी आवर्जुन सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात आदिवासी कवर समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश बागडेहरिया, उपाध्यक्ष गोपाल घाटघुमर, सचिन रामरतन सुवा, सदस्य गणेश रक्षा, श्यामलाल घाटघुमर, संतलाल सुवा, भारत सुवा, प्रभू प्रवाटी, कलमतराम बागडेहरीया, रामदास थाटमोर्रे, कमलसिंग फुलकुंवर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
मानववंश सर्वेक्षणाचा विरोध
By admin | Published: December 08, 2015 2:19 AM