शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

संस्कृतीने दिली महिलांना रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बºयाच लोकांमध्ये विविध कौशल्य असते. पण ते कौशल्य दाखविण्याची संधी अनेकांना मिळत नाही. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच जण करतात. मात्र प्रत्यक्षात कार्य करणारे कमी असतात. पण संस्कृती महिला मंडळ याला अपवाद ठरत असून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देत रोजगाराची संधी प्राप्त ...

ठळक मुद्देवर्षा पटेल यांचा पुढाकार : स्वदेशी कला संस्कृतीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बºयाच लोकांमध्ये विविध कौशल्य असते. पण ते कौशल्य दाखविण्याची संधी अनेकांना मिळत नाही. महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी सर्वच जण करतात. मात्र प्रत्यक्षात कार्य करणारे कमी असतात. पण संस्कृती महिला मंडळ याला अपवाद ठरत असून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देत रोजगाराची संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळेच मंडळाच्या ३५० वर महिलांचे हात बळकट झाल्याचे दिलासा दायक चित्र आहे.माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी वर्षा पटेल देखील सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. वर्षा पटेल यांच्याच पुढाकाराने २००९ मध्ये संस्कृती महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळात सर्वच समाजाच्या आणि विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग आहे. सुरूवातीपासूनच या मंडळाचे आगळे वैशिष्टये राहिले आहे. दरवर्षी वेगळा उपक्रम राबवून महिलांनामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. या मंडळातील सर्वच महिला मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे.कुणी चांगली गृहीण, कुणी चांगले सुग्रण पदार्थ तयार करणारी, तर कुणी विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यात पारंगत आहे. कुणाला साडीवर चांगली पेंटीग, डिझाईन, हातकाम तर कुणी क्रॉसस्टिचिंग वर्क करण्याचे उत्कृष्ट काम करतात. यासर्वांमधील हे विविध गुण हेरुन वर्षा पटेल यांनी संस्कृती मंडळाच्या माध्यमातून ओळख निर्माण करुन देण्याचा संकल्प सोडला. त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहे.संस्कृती महिला मंडळाचे हे आठवे वर्ष आहे. सध्या दिवाळी निमित्त बाजारपेठेत विविध वस्तूंची रेलचेल आहे. दिवाळीत प्रामुख्याने खाद्यपदार्थ, आकाश दिवे, पणत्या, पॉकिंग बॅक, आकर्षक पर्स, साड्या, कोश्याचे कापड यांची मोठी मागणी असते. यासर्व वस्तू जर येथेच तयार केलेल्या मिळालेल्या तर त्याची विश्वासहर्ता देखील अधिक असते. या वस्तू विक्रीच्या माध्यमातून महिलांना देखील रोजगार मिळेल.महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळेल याच हेतूने वर्षा पटेल यांनी यावर्षी गोंदिया येथील मनोहरभाई पटेल कॉलनीत मीना बाजारचे आयोजन करुन महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यास मानस व्यक्त केला. शनिवारी (दि.७) या मीना बाजारचे उद्घाटन कुणी मंत्री किंवा बड्या व्यक्तीच्या हस्ते न करता ज्येष्ठ महिला कुमुद पटेल यांच्या हस्ते करुन महिलांचा सन्मानात आणखी भर घातली.या वेळी मंडळाच्या समस्त महिला आणि शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.विशेष म्हणजे या मीना बाजारमध्ये स्वत: वर्षा पटेल यांनी डिझाईन केलेल्या साड्यांचा स्टॉल लावला होता. त्यांनी स्वत: उपस्थित राहून एक एका स्टॉलवरी वस्तूंचे वैशिष्टये सांगितले.८७ वर्षांचे वय तरी क्रासस्टिचींग उत्तममनोहरभाई पटेल कॉलनीत शनिवारी संस्कृती मंडळातर्फे मीना बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन कुमुद पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यामागील कारण देखील तसेच आहे. त्यांच वय ८७ वर्षांचे असले तरी त्यांच्याच उत्तम कलाकुसरीचा गुण आहे. क्रासस्टीचींग यात त्या अतिशय पारंगत असून अजूनही त्या तेवढ्याच बारकाईने काम करतात. त्यांनी क्रासस्टिचींगव्दारे तयार केलेली पेटींग पाहिल्यास सर्वच जण आश्चर्य चक्कीत होतात.गुजरातचा ढोकला, पाणीपुरी, ढाकणीमीना बाजारात कलाकसुरीच्या विविध वस्तूंप्रमाणेच खमंग खाद्य पदार्थांचे स्टॉल होते. यात गुजरातचा ढोकला, विविध प्रकारची पाणी पुरी, ढाकणी या पदार्थांचे विशेष आकर्षण होते. शहरातील नागरिकांनी या मीना बाजारला आर्वजून भेट देत या सर्व पदार्थांची चव चाखली. तसेच अशा प्रकारचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.सेंद्रीय भाजीपालायेथील मीना बाजारमध्ये सेंद्रीय भाजीपाल्याच्या देखील स्टॉल होता. महिला स्वत: शेती करित असून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या सेंद्रीय शेतमालाला चांगली मागणी आहे. येथे देखील ग्राहकांनी सेंद्रीय भाजीपाल्याची आवडीने खरेदी केली.मंडळाच्या सदस्यांचा सक्रिय सहभागमीना बाजाराच्या यशस्वी आयोजनाकरिता संस्कृती महिला मंडळाच्या निमिषा पटेल, नेहा पटेल, पद्मा पटेल, निता पटेल, विजेता पटेल, सुषमा अग्रवाल, शिल्पा पटेल, पायल पटेल, श्वेता पटेल, हिमांशी तुरकर, ज्योती परमार, पुनम ठाकूर, निमिषा मेहता, हिना पटेल, मोनिका पटेल, बिना पटेल यांच्यासह अन्य सदस्यांचा यात सक्रीय सहभाग होता.