शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

आमगाव न.प.त जाण्यास ग्रा.पं.चा विरोध

By admin | Published: January 24, 2017 2:04 AM

आमगावात शेतकऱ्यांचे वास्तव्य आहे. येथे एमआयडीसी नाही, उद्योग नाही, नगरपरिषदेसाठी जागाही नाही.

माजी अर्थमंत्री अनुकूल नाही : १० हजार तक्रारी देण्यासाठी सरपंच व उपसरपंचांचा पुढाकार गोंदिया : आमगावात शेतकऱ्यांचे वास्तव्य आहे. येथे एमआयडीसी नाही, उद्योग नाही, नगरपरिषदेसाठी जागाही नाही. नगर परिषदेसाठी ३५ टक्के लोक उद्योजक असायला पाहिजे. परंतु ते नसताना सरकारने आमगावला नगरपरिषद घोषित केले तर नागरिकांच्या अधिकाराचे हनन होईल, असे सांगत राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचाचे माजी पदाधिकारी महादेवराव शिवणकर यांनी आमगाव नगर परिषदेवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्यासह लगतच्या ग्रामपंचायतींमधील पदाधिकाऱ्यांनीही आपला विरोध नोंदविला आहे. यासंदर्भात सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी नगर पंचायत स्थापन करण्याची अधिसूचना काढली होती. परंतु आमगाव सोडून साकोली व अन्य तालुकास्थळांना नगर पंचायतीचा दर्जा देऊन त्यांच्या निवडणुकासुद्धा झाल्यात. परंतु आमगावमध्येच नगर परिषद स्थापन करण्याचे कारण न समजण्यासारखे आहे. नगर परिषदेऐवजी नगर पंचायत का स्थापन करण्यात आली नाही? आमगाव नगर पंचायतसंबंधीचा जी.आर. रद्द केला काय? सरकारच्या यादीतून आमगावचे नाव का वगळण्यात आले? असे प्रश्न करीत शिवणकर यांनी काही लोकांच्या दबावाला सरकार बळी पडले आहे, असा आरोप केला आहे. पंचायत समिती आमगावला आहे. तहसील कार्यालय, सिव्हील जज, ज्युनियर डिव्हीजनल, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा परिषद शाळा या सर्व ग्रामीण क्षेत्रात असलेल्या सुविधा आमगावमध्ये जागा नाही म्हणून वेगवेगळ्या ग्राम पंचायतीत जागा देवून त्या लागू केल्या आहेत. जागेचा अभाव आमगाव ग्राम पंचायतमध्ये आहे. आमगावला कुटुंबाची संख्या २०९४ असून त्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या (खातेदार) २३५० आहे. म्हणजे हे गाव ग्रामीण क्षेत्रात येते. नगर परिषदेसाठी फक्त नॉन अ‍ॅॅग्रीकल्चर प्लॉट ३५ टक्के जे असायला पाहिजे ते पण येथे नाही. ५ ते ७ टक्के अकृषक जमीन आहे. ती अकृषक जागा प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी घरे बांधण्यासाठी केली आहे. महाराष्ट्र नगर पंचायत आणि उद्योग कायद्याच्या कलम १९६५ अन्वये आमगाव नगर परिषद कोणत्याही नियमात बसत नाही. हे क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून असू द्यावे, नगर पालिका क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा दबाव निर्माण करु नये, ग्रामीण क्षेत्राचा विकास केंद्र सरकार व राज्य सरकारची जवाबदारी आहे व ते केल्या जात आहे. क आणि ड वर्ग नगर परिषद पूर्वी करण्यात आल्या त्या अविकसित आहेत. आमगाव क्षेत्रात आमगाव नगर परिषद करु नये म्हणून आपण आमच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमगाव क्षेत्रात अनुसूचित जातीचे लोक मोठ्या संख्येत आहेत. त्यांचे क्षेत्र नगर परिषद झाल्यास त्यांचे अधिकार बाधित होतील. आमगावला नगर पंचायत करावी, पुढची पायरी १० वर्षानंतर नगर परिषद येईल. आक्षेप लक्षात घेऊन नगर परिषद स्थापन न करण्याच्या बाबतचा विचार करावा, अशी शिफारस राज्य सरकारला करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, पं.स. सदस्य छबू उके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष रविदत्त अग्रवाल, रिसामाचे उपसरपंच तिरथ येटरे, महेश उके, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, किडंगीपार, बिरसी, पदमपूर येथील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) ३५ टक्के लोक असावे उद्योजक ४नगर परिषद क्षेत्र करण्यासाठी त्या परिसरातील ३५ टक्के लोक उद्योजक असायला पाहीजे. आमगावची लोकसंख्या १० हजार २०० असून कुटुंबांची संख्या २०९४ आहे. म्हणजे आमगावची लोकसंख्या २५ हजारापेक्षा कमी आहे. सर्व लोक ग्रामीण आहेत. सभोवतालच्या ग्राम पंचायतीला जोडून ही लोकसंख्या जमविण्याचा प्रयत्न केला तरी या ग्राम पंचायतींवर अन्याय होईल. आमसभा व ग्रामपंचायतीने त्या प्रस्तावाला पुर्वीच विरोध केला आहे. नेत्यांच्या इच्छेखातर न.प. लादू नये ४काही नेते मंडळी नागरिकांच्या अधिकारांचे हनन करुन भूलथापा देत महाराष्ट्र सरकारच्या नगर परिषद कायद्याचे पालन न करता सरकारवर दबाव आणत आहेत. सामान्य नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण करावे, काही नेत्यांच्या लहरीखातर व त्यांना खुष करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इच्छेखातर नगर परिषद आमच्यावर लादून आमच्या अधिकाराचे हनन करु नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामसभेत घेणार ठराव ४आमगाव नगर परिषद होऊ नये यासाठी ग्राम पंचायती देखील गावागावात ग्रामसभा घेऊन आक्षेप नोंदवत आहेत. आमगाव नगर परिषदेला आक्षेप म्हणून या परिसरातील १० हजार लोक आक्षेप सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे नगर परिषद सक्षम होणार नाही महाराष्ट्र नगर परिषद कायद्याप्रमाणे आमगाव नगर परिषद कोणत्याही स्थितीत होऊ शकत नाही. ग्राम पंचायत आमगाव, बनगाव, रिसामा, पदमपूर, माल्ही, किंडगीपार, बिरसी या सर्व ग्राम पंचायतीच्या अधिकारांचे हनन करुन जर नगर परिषद केली तर ती सक्षम होणार नाही. या ग्राम पंचायतींनी ठराव करुन व आमसभेत या नगर परिषदेला विरोध केला आहे. त्या गावांच्या आमसभेने सुद्धा विरोध केला आहे. - महादेवराव शिवणकर माजी अर्थमंत्री