लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील सात- आठ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवून बसलेल्या त्या एजंसीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बॅकेत खाते उघडण्याचे आदेश मुख्याधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या लेखा विभागाने सेंट्रल बँकेला पत्र दिले आहे. एजंसीकडून होत असलेली कर्मचाऱ्यांची पिळवणूक मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आली असून बँकेत खाते उघडल्याने एजंसी किती पगार कर्मचाऱ्यांना देते हे सुद्धा दिसून येणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नगर परिषदेने एका एजंसीच्या माध्यमातून विविध विभागांत कर्मचारी कामावर घेतले आहेत. मात्र या एजंसीकडून कर्मचाऱ्यांना मागील सात-आठ महिन्यांचे देण्यात आले नाही. शिवाय ठरविलेल्या पगारातून कितीतरी रक्कम कापून त्यांना पगार दिला जातो. पोटा-पाण्याचा प्रश्न असल्याने गरीब कर्मचारी गप्प बसून सर्व काही सहन करीत आहेत. विशेष म्हणजे, अधिकारी व पदाधिकारीही काहीच करीत नसल्याने एजंसीचा मनमर्जी कारभार सुरूच आहे. सध्या उप जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे नगर परिषदेचा कारभार असल्याने एजंसींतर्गत कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी घुगे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार लक्षात आणून दिला.यावर घुगे यांनी नगर परिषद लेखा विभागाला एजंसींतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे बँँकेत खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत. मुख्याधिकारी घुगे यांच्या आदेशावर नगर परिषद लेखा विभागाने सेंट्रल बँकेला पत्र दिले असून कर्मचाऱ्यांचे खाते उघडण्यास सुरूवात झाली आहे. एजंसीच्या माध्यमातून सुमारे १२५ कर्मचारी कार्यरत असून यातील काहींचे खाते उघडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खाते उघडल्यानंतर आता या कर्मचाºयांचा पगार खात्यात टाकावयाचा असल्याने एजंसी किती पगार टाकते हे दिसून येणार आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या आदेशाने एजंसीमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आता पगार काढून देण्याची अपेक्षानगर परिषदेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून जे जमले नाही ते दीड महिन्यासाठी आलेल्या घुगे यांनी करून दाखविले. घुगे यांच्या आदेशावरून या कर्मचाऱ्यांचे खाते उघडण्यात आले असून पगारात पारदर्शीता व त्याचा हिशोब मिळणार आहे. मात्र मागील सात-आठ महिन्यांपासून कित्येक कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. आता तो पगार काढून देण्यात यावा, तसेच पुढेही नियमित पगार मिळण्याची यवस्था व्हावी अशी अपेक्षा कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांकडून बाळगून आहेत.
भोंगळ कारभारानंतरही कामे सुरूचकर्मचाऱ्यांची पगार कपात करणे तसेच कित्येक महिन्यांपासून पगार न देणे, असे प्रकार संबंधीत एजंसी संचालकाकडून केले जात असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. असे असतानाही रजेवर असलेले मुख्याधिकारी चंदन पाटील तसेच पदाधिकाºयांनी एजंसीवर काहीच कारवाई केली नाही. अशात या अधिकारी व पदाधिकाºयांची या एजंसीवर मेहरबानी कशाला असा सवाल कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबतच अन्य नगर परिषद कर्मचारी व सदस्य करीत आहेत.