शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

जलाशयातून पाणी सोडण्याचे आदेश निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:49 PM

जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईग्रस्त गावांना होणार मदत : तीन जलाशयातून सोडणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासून पायपीट करावी लागत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे. या मागणीचा प्रस्ताव जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या स्थाथी समितीत ठेवला होता. त्याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणी टंचाइर् निवारणार्थ उपाय योजना करण्यात प्रशासनाला यावर्षी पूर्णपणे अपयश आले. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला.परिणामी मार्च महिन्यात तलाव, विहिरी बोड्या आणि बोअरवेलनी तळ गाठण्यास सुरूवात केली. तर सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा सध्या स्थितीत केवळ १२ टक्केच पाणी साठा आहे. याचा भूजल पातळीवर परिणाम झाल्याने शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करीत मे महिन्यापर्यंत वेळ मारुन नेली. परिणामी जिल्हावासीयांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करण्याची पाळी आली आहे. जि.प.च्या १८ मे रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत गंगाधर परशुरामकर यांनी जलाशयात काही प्रमाणात पाणी साठा शिल्लक असून तो सोडल्यास पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. याला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुध्दा एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी २१ मे रोजी जलाशयातील पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चुलबंद जलाशयाचे पाणी म्हसवाणी, घोटी, बोथली, डव्वा, घाटबोरी-तेली १ दसलक्ष घनमीटर तर सिरपूर जलाशयाचे पाणी मकरधोकडा, शिलापूर, पद्मपूर, फुक्कीमेटा, धारणी या गावांसाठी २ दसलक्ष घनमीटर, ओवारा मध्यप्रकल्पाचे पाणी रामाटोला, माळीटोला, वळद, कंटगटोला, कवडी, पानगाव, येरमडा या गावांसाठी १ दसलक्ष घनमीटर आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कासा, बिरसोला, काटी या गावांकरिता ०.७५ दसलक्ष घन मिटर पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. या मुळे या परिसरातील गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलाशयातून पाणी सोडण्यात यावे यासाठी परशुरामकर यांनी मागील तीन दिवसांपासून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाºयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.