लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत निकृष्ट होऊन उत्पादनशक्ती कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. नाइलाजाने शेतकरी हवालदिल होतो. शेतकºयांच्या घरामध्ये आनंदीमय वातावरण निर्मितीसाठी तसेच शेती उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेतीची कास धरुन स्वत:चा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्यावतीने ‘एक दिवस शेतकºयांच्या बांधावर’ प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी शेतकºयांशी हितगूज करतांना ते बोलत होते. कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया शेत शाळा, सेंद्रीय शेती, यांत्रिकी पद्धतीने भात लागवड, शेतकरी उत्पादक कंपनी आदीचा आढावा घेण्याकरिता तसेच शेतकºयांशी प्रत्यक्ष बांधावर जावून हितगूज साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण, तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, संग्रामे उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी काळे यांनी बुधेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांशी चर्चा केली. यात रोवणी यंत्राद्वारे भात लागवड व व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. शेती शाळेत रोवणी यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे शेतकºयांना कशाप्रकारे झाले, परंपरागत व रोवणी यंत्राद्वारे रोवणी यांच्यातील फरक याबाबत शेतकºयांकडून जिल्हाधिकाºयांनी माहिती जाणून घेतली. अशोक लंजे यांच्या शेतात जावून रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या धान पिकाची पाहणी जिल्हाधिकाºयांनी केली. नंतर बोंडगावदेवी येथील शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे , रोवणी यंत्राद्वारे भात लागवड करणाºया शेतकºयांच्या सभेत जिल्हाधिकारी काळे यांनी शेती संदर्भातील समस्या, शेतकरी आत्मसात करीत असलेले शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, रोवणी यंत्राचे भात शेतीस झालेले फायदे व समस्या, सेंद्रिय शेती प्रकल्प राबविणाºया शेतकºयांना झालेला फायदा व काही अडचणी याविषयी माहिती दिली. पाहणीत हिरालाल बोरकर यांच्या शेतास भेट दिली. रोवणी यंत्राद्वारे रोवणी केलेल्या शेताची प्रत्यक्षात पाहणी केली. कुकसु मेश्राम यांच्या शेतातील सेंद्रिय शेतीस भेट देवून हळद लागवड, चवळी लागवड व रोवणी यंत्राद्वारे करण्यात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पात आलेल्या भात लागवडीची पाहणी केली. चान्ना/बाक्टी येथील कंपनीच्या भात गिरणी प्रकल्पास भेट दिली. कान्होली येथील नवेगावबांध तलाव पाणलोट क्षेत्रातील सेंद्रिय शेती प्रकल्पाची पाहणी केली. कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर्फे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, स.व्य.जी.आर. चचाणे, एस.एन. बोचरे, चिंतामन मसराम, भोजराज नखाते यांनी सहकार्य केले.
आरोग्य वर्धनासाठी सेंद्रिय शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:36 PM
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उत्पादन वाढत असले तरी शेतजमिनीची सुपीकता कमी होते.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी काळे यांचे आवाहन : बांधावर शेतकºयांशी साधला संवाद