शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

अनाथ बालकाचा नाथ हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:37 AM

अर्जुनी मोरगाव : ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा "नाथ" मिळाला. त्याने ...

अर्जुनी मोरगाव : ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाळीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते तेव्हा "नाथ" मिळाला. त्याने स्वीकारले. घरपण दिले. माझ्या भविष्याचे स्वप्न रंगवले. सारे काही सुरळीत असतांनाच कोरोनाचा शिरकाव झाला. अन त्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले. गोंदियाचे जिल्हाधिकारीसुद्धा तेवढेच भावूक. त्यांनीही साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ देत त्या माऊलीला जगण्याचे बळ दिले.

अर्जुनी मोरगावच्या सिव्हील लाईन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोंडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही. जन्मदात्यांनीच वाळीत टाकले. अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पण हे हास्य क्षणभंगूर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अधुरेच राहिले. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी ती माऊली आहे खरी, पण कपाळावरचे कुंकू पुसल्याने तिचे अवसानचं गळाले. काय करावे सुचेना. मात्र प्रशासनातील एक अधिकारी एवढा संवेदनशील असू शकतो याचा प्रत्यय त्यावेळी आला, जेव्हा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्याचे वाहन येवले यांच्या घरासमोर थबकले. यादरम्यान घरासमोरून कितीतरी पाऊलं, वाहनं गेली असतील पण ती थबकली नाहीत. आल्या-आल्याच त्यांनी अगदी सामान्य माणसाप्रमाणे विचारपूस केली. अन्नधान्य विचारलं. चिमुकल्याच्या शिक्षणाचं विचारलं. रोजगाराची काय सोय आहे तेही विचारलं. यापैकी काय हवंय का? त्याची आस्थेने विचारपूस केली. बहिणीला भावाकडून एक भेट म्हणून साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ आणले त्याचं स्वीकार कर असं अत्यंत भावूक होत बोलले. तिच्या डोळ्यात दुखाश्रू-आनंदाश्रू तरळले. तिनं सुद्धा जिल्हाधिकारी भावाकडून भेटवस्तू स्वीकारल्या. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे राजेश खवले. त्यांनी तिला धीर दिला व जातांना मला माझ्या भावाने पाठवले आहे. माझे हे काम आहे त्यात सहकार्य करा असे सांगत तहसीलदारांकडे जाण्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

......

प्रशासनाची सहृदयता

कोरोनात कुणी पती-पत्नी,आई -वडील,मुले गमावली. त्यांच्याप्रति सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता अर्जुनी मोरगाव तालुक्यात बघावयास मिळत आहे. येथील तहसीलदार विनोद मेश्राम हे स्वतः कोरोनात जीव गमावलेल्याना साडी-चोळी, पात्र लाभार्थ्यांना कुटुंब अर्थसाहाय्य, मोफत अन्नधान्याचे रेशनकार्ड, निराधार योजनेचे लाभ मिळण्यासाठी त्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच राजोली-भरनोली, मोरगाव, निमगाव, खामखुरा येथे भेट दिली. प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे याचा प्रत्यय येत आहे.

............

शासनाने मदत द्यावी

कोरोना महामारीत अनेकांनी घरचे कर्ते पुरुष गमावले. होते नव्हते ते त्याच्या उपचारात खर्ची झाले. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहेत. ज्यांना रोजगार नाहीत त्यांनी भविष्याची वाटचाल कशी करायची हा यक्षप्रश्न आहे. एकतर कोरोना आजाराचे वेळी रुग्णालयात झालेला आर्थिक खर्च शासनाने द्यावा, ज्या कुटुंबांनी कर्ते पुरुष गमावले त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शासनाने आर्थिक मदत करावी अशी कोरोनामुळे जीव गमावलेल्या कुटुंबीयांची मागणी आहे.