लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : हसण्या बागडण्याच्या वयात जन्मदात्या मायबापाचे पत्र हिरावून बसलेल्या निरागस अनाथ मुुलांना सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांनी पुढाकार घेत शेकडो दानदात्यांच्या योगदानाने धान्य, जीवनोपयोगी वस्तु, कपडे, शालेय साहीत्य तसेच आर्थिक मदत दिली. जन्मदातयाची ऊब देण्याच्या एक कौटुंबीक मनोमिलनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी (दि.२२) घेण्यात आला.जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत राहून सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून देणारे शिक्षक मेश्राम यांनी आपल्या सौंदड येथील निवासस्थानी जिल्ह्यातील अनाथ मुला-मुलींना भरभरुन मदत करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे ३२ मुले-मुली कार्यक्रमानिमित्त एकत्र झाले होते. अनाथ मुलांना जन्मदात्याचे पाठबळ देऊन त्यांना मायबाबाच्या ममतेची उब देण्याच्या मनोमिलन समारंभाला सरपंच गायत्री इरले, उद्योगपती रमेश खंडेलवाल, जगदिश लोहिया, गोंदियाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. सविता बेदरकर, बोंडगावदेवीचे सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे, पं.स.सदस्य मंजुषा डोंगरवार, माजी सभापती आरती चवारे, माजी उपसभापती दामोधर नेवारे, नायब तहसीलदार भाऊराव यावलकर, रोशन बडोले, यशवनत दुनेदार, किरण मोदी, सेवानिवृत्त सहा. फौजदार सुखदास मेश्राम, के.डी.रहेले प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यातील गोंदिया परिसरातील अनाथ मुलांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी डॉ. बेदरकर तसेच अर्जुनी-मोरगाव परिसरातील अनाथ मुलांना आणण्याची जबाबदारी ठवरे यांनी सांभाळली होती. संपूर्ण एक दिवस अनाथ मुलांसोबत त्यांनी घालविला. त्यांच्या संगोपणाची तसेच शिक्षणासंबंधी विषयी माहिती समाजशील दानदात्यांनी मोठ्या आस्थेने जाणून घेतली.यावेळी जिल्ह्यातून आलेल्या ३२ अनाथ मुला-मुलींना तांदूळ, गहू, दाळ, तेल व इतर जिवनोपयोगी वस्तु, कपडे, बेडशीट, स्कूल बॅग, शालेय साहित्य तसेच रोख रकमेचे वाटप करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी अनाथ मुलांसोबत भोजनाचा आस्वादही घेतला. अनाथ मुलांना हातभार लावण्यासाठी शिक्षक मेश्राम यांच्या पुढाकाराने रमेश खंडेलवाल, जगदिश लोहिया, गायत्री इरले, तहसीलदार उषा चौधरी, सुखदास मेश्राम, रामचंद्र भेंडारकर, प्रशांत ठवरे, नरसिंग अग्रवाल, देवचंद तरोणे, जगदिश तरोणे, सय्यद ब्रदर्स, भगवान कांबळे, रमेश चुºहे, ललीत अग्रवाल, व्ही.एम.काळे, लता हटकर, टी.बी.सातकर, बालवीर राऊत, लायनेस क्लब सौंदड, सावित्रीबाई फुले पतसंस्था, मैत्री मंच डॉ. संकेत परशुरामकर, नवलकिशोर, अग्रवाल, लिलाराम गहाणे, प्रकाश काशिवार, मंजुषा डोंगरवार इत्यादिंनी भरभरुन योगदान दिले.संचालन दामोधर नेवारे यांनी केले. प्रास्ताविक अमरचंद ठवरे यांनी मांडले. आभार शिक्षक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक मेश्राम यांच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले.
अनाथांना मिळाली मायबापाची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 9:56 PM
हसण्या बागडण्याच्या वयात जन्मदात्या मायबापाचे पत्र हिरावून बसलेल्या निरागस अनाथ मुुलांना सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांनी पुढाकार घेत शेकडो दानदात्यांच्या योगदानाने धान्य, जीवनोपयोगी वस्तु, कपडे, शालेय साहीत्य तसेच आर्थिक मदत दिली. जन्मदातयाची ऊब देण्याच्या एक कौटुंबीक मनोमिलनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी (दि.२२) घेण्यात आला.
ठळक मुद्देशिक्षक मेश्राम यांचा पुढाकार : धान्य, कपडे, शालेय साहित्य व आर्थिक भेट