लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अधिकारी व जनप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी (दि.१६) रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच अनिरुद्ध शहारे व रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतीश कोसरकर यांनी पालकमंत्री परिणय फुके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.येथील ग्रामीण रूग्णालयात २६ पदे मंजूर असून प्रत्यक्षात १० कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. एक वैद्यकीय अधिकारी व दोन परिचारिका सध्या रुग्णालयाची आरोग्य सेवा सांभाळत आहेत. औषध निर्माता रजेवर गेल्याने स्वत: वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधांचे वाटप करावे लागत आहे. दररोज ३०० ते ३५० पर्यंत रुग्ण येथे उपचारासाठी येतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्या व उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक गर्दी वाढत आहे. त्या तुलनेत एक वैद्यकीय अधिकारी व दोन अधिपरिचारिकींची सेवा अपुरी पडत आहे.यावर सरपंच शहारे, रुग्ण सेवा कल्याण समितीचे सदस्य कोसरकर व गावकºयांनी जिल्हा शल्य चिकीत्सक, आरोग्य सेवा उपसंचालक, पालकमंत्री डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी, आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे मागणी केली. परंतु त्याला अद्यापही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. रिक्तपदाची पूर्तता किंवा पर्यायी व्यवस्था अजूनही झाली नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा गंभीर रुप धारण करीत आहे. आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांना याचा फटका बसत आहे. एकंदर घटनाक्रम पाहता जिल्हा शल्यचिकीत्सकांसह आरोग्य प्रशासन या प्रश्नावर गंभीर नसल्याचे व या रुग्णालयाच्या समस्या सोडविण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे, असे निवेदनात नमूद आहे.अशात, सोमवारपर्यंत (दि.१५) रिक्त पदे न भरल्यास किंवा पर्यायी व्यवस्था न केल्यास मंगळवारी (दि.१६) ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच शहारे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य कोसरकर व गावकऱ्यांनी दिला आहे.
अन्यथा मंगळवारी रुग्णालयाला कुलूप ठोकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 9:12 PM
येथील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त२२ पदांची भर्ती किंवा पर्यायी व्यवस्था करुन वैद्यकीय अधिक्षकासह दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व औषध निर्मात्यांच्या पदांची पूर्तता करण्याची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांचाइशारा : रिक्त पदे भरा वा पर्यायी व्यवस्था करा !