नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत शिक्षण विभागाकडून डिसेंबर व जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत ११४ शाळाबाह्य मुले असल्याचे पुढे आले. विशेष म्हणजेच, यातील १७ मुले कधीच शाळेत गेले नसल्याचे उघडकीस आले आहे.महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जाते. गोंदिया जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेणाºया चमूने सतत ३० दिवस शाळेत गैरहजर राहणाºया शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला.यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून ४, आमगाव १३, गोंदिया ६७, गोरेगाव ५, सालेकसा २, तिरोडा तालुक्यात ६ अशी ९७ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले. तर ज्या मुलांनी आतापर्यंत शाळा बघितलीच नाही अशी १७ मुले गोंदिया शहरात आढळली आहेत.जिल्ह्यात कुडवा, रेल्वे स्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाऱ्या, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शासनाकडून प्रत्येक बालकावर ३ हजार रुपये शिक्षण विभागाला दिले जात आहे. ती रक्कम शिक्षण विभाग कुटुंबियांच्या खात्यात न टाकता पुस्तक व गणवेश यावर खर्च करीत आहे.दोन तालुक्यात एकही बालक नाहीसन २०१७-१८ मध्ये शिक्षकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यात एकही शाळाबाह्य मूल आढळले नाही. सर्वाधीक ८४ शाळाबाह्य मुले गोंदिया तालुक्यात आढळले आहेत. ग्रामीण भागातील शंभरटक्के मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. परंतु शहरातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहत आहेत.तीन वर्षात ६१५ शाळाबाह्य मुलेमागील तीन वर्षात ६ ते १४ वर्षे वयोगटातील ६१५ मुले शाळाबाह्य असल्याचे लक्षात आले. सन २०१५-१६ मध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या सर्वेक्षणात ३५९ शाळाबाह्य मुले आढळले होते. यातील ३१३ मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. तर ६-७ वर्षातील ४६ मुलांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षात शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणात १४२ मुले शाळाबाह्य आढळली. यात ६५ मुले व ५४ मुलींचा समावेश आहे. त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तर ५ मुलांना सरळ शाळेत दाखल करण्यात आले. सन २०१७-१८ या वर्षात ११४ मुलांना शोधण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे.
११४ शाळाबाह्य मुले येणार मुख्य प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 9:17 PM
भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत शिक्षण विभागाकडून डिसेंबर व जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली.
ठळक मुद्देविशेष प्रशिक्षण देणार : १७ मुलांनी बघितलीच नाही शाळा