शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

चारपैकी भाजपकडे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार एक मतदारसंघ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 4:00 PM

महायुतीचे सूत्र : एका मतदारसंघात नवीन चेहऱ्यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नाही. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे आणि एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असून, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपकडे असलेल्या तीन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाणार असून, त्यासाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे.

पुढील आठवडाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तशा सूचना पक्षाकडून स्थानिक आमदार आणि नेत्यांना दिली आहे. त्यामुळेच सध्या मेळावे, भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे, तर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मुंबई आणि नागपूरच्या वाऱ्या करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळण्याचा विश्वास आहे, त्यांनी शांतपणे आपले काम सुरू ठेवले आहे. 

जिल्ह्यात गोंदिया, अर्जुनी मोरगाव, आमगाव, तिरोडा हे चार मतदारसंघ आहेत. यापैकी अर्जुनी मोरगाव मतदारसंघ सीटिंग गेटिंग या सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असून, त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, तर आमगाव, गोंदिया तिरोडा मतदारसंघ भाजपकडे राहणार आहेत. यापैकी गोंदिया मतदारसंघातून आ. विनोद अग्रवाल हे, तर तिरोडा मतदारसंघातून विजय रहांगडाले यांना तिसऱ्यांदा भाजप मैदानात उतरविण्याची शक्यता आहे, तर आमगाव मतदारसंघात पक्ष नवीन चेहरा देते, की जुने ते सोने म्हणते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उमेदवारी देताना भाजपने केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेतला जाणार असून, यात मेरिटवर असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर होणार असल्याने भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

गोंदिया आजी माजीमध्ये रंगणार सामना गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध काँग्रेस सामना रंगणार असल्याचे भाजपचे आ. विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. विद्यमान आ. विनोद अग्रवाल व काँग्रेसकडून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून, अपक्ष आणि तिसरा घटक यात किती मते घेतो, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे. 

अर्जुनी मोरगाव मतदारसंघात बंडखोरीची शक्यता अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान आ. मनोहर चंद्रिकापुरे हे रिंगणात राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास गेल्या वर्षभरापासून तयारी करीत असलेले भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले हे नेमकी काय भूमिका घेतात, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात इच्छुकांची संख्या बरीच आहे. त्यामुळे यातील इच्छुकांना डावलून नवीन चेहऱ्याला संधी दिल्यास याठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीgondiya-acगोंदिया