शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

शाळाबाह्य मुलांचे आज सर्वेक्षण

By admin | Published: July 04, 2015 2:05 AM

शाळाबाह्य मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा शोध घेण्याचे काम शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत केले जाणार आहे.

गोंदिया : शाळाबाह्य मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा शोध घेण्याचे काम शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत केले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या कामात १० हजार ४३४ कर्मचारी सहभागी होणार आहेत. प्रत्येकाच्या घरी, बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक व शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी. गावडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. आमगाव तालुक्यातील २७ हजार ५८२ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ४७२ सर्वेक्षण अधिकारी, २५ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३६ हजार ८९० कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३४५ सर्वेक्षण अधिकारी, १७ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. देवरी तालुक्यातील २६ हजार २२ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २९४ सर्वेक्षण अधिकारी, १५ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. गोंदिया तालुक्यातील ८३ हजार ८१८ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी १०३५ सर्वेक्षण अधिकारी, ४४ झोनल आॅफीसर व वर्ग एकचे ३ नियंत्रक सर्वेक्षण करणार आहेत. गोरेगाव तालुक्यातील २६ हजार १०७ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ३१२ सर्वेक्षण अधिकारी, १६ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील २४ हजार ८५० कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २६५ सर्वेक्षण अधिकारी, १३ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. सालेकसा तालुक्यातील १८ हजार ६६ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी २२३ सर्वेक्षण अधिकारी, १२ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. तिरोडा तालुक्यातील ३५ हजार ९४९ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ४३५ सर्वेक्षण अधिकारी, २३ झोनल आॅफीसर व वर्ग एकचा एक नियंत्रक सर्वेक्षण करणार आहे. या शिवाय प्रत्येक सर्वेक्षण अधिकाऱ्यासोबत एक अंगणवाडी सेविका व एक आशा स्वयंसेविका राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)