लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक मुल शाळेत येतील टिकतील व शिकतील यादृष्टीने जिल्ह्यातील बालरक्षक काम करीत आहे. शाळाबाह्य बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली मदतीचे स्त्रोत व बालरक्षकासाठी असलेली सहाय्यक यंत्रणा यात महत्त्वाची भूमिका आहे. शाळाबाह्य मुले किंवा स्थलांतरीत बालकांच्या शोधासाठी १६ ते२० डिसेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत बालरक्षक शिक्षकांद्वारे शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली आहे.सन २०१८-१९ मध्ये शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा व बालरक्षकांच्या सहकार्याने गोंदिया जिल्हा शाळाबाह्य मुक्त झालेला आहे. शाळाबाह्य बालकांमध्ये सतत ३० दिवस गैरहजर किंवा त्यापेक्षा अधिक काळ गैरहजर असलेले, अस्थायी कुटुंब स्थलांतर होऊन आलेले, शिक्षणात खंड पडलेले व कधीच शाळेच दाखल न झालेले शाळाबाह्य बालक आढळतात. प्रत्येक शाळेने आपल्या परिसराचा ३ किमी अंतरावर शाळाबाह्य बालकांचा शोध सातत्याने घेण्याबाबत यापूर्वीच निर्देश दिले आहेत. डिसेंबर ते मार्चपर्यंत विटभट्टया सुरू होतात. त्याठिकाणी शाळाबाह्य बालकांचा शोध घेणे गरजेचे आहे. सन २०१९-२० मध्ये शाळाबाह्य व स्थलांतरीत बालकांची शोधमोहीम वर्षातून तीन वेळा करण्याबाबत संदर्भात पत्र काढण्यात आले आहे. १९ ते २३ आॅगस्ट २०१९ ला या सत्रातील पहिली शोध मोहिम राबविली होती.त्यामध्ये १० शाळाबाहय बालक आढळले होते.दुसरा टप्पा १६ ते २० डिसेंबर २०१९ ला बालरक्षक शिक्षकांद्वारे शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेने व सर्व बालरक्षक शिक्षकांनी १६ ते २० डिसेंबर २०१९ या कालावधीत आपल्या क्षेत्रातील ३ किमी अंतरावर स्थलांतरीत शाळाबाह्य बालकांचा विटभट्टीतील तसेच दगडखाण येथे शोध मोहीम राबविली जाणार आहे. शोध मोहिमेदरम्यान आढळलेल्या शाळाबाह्य स्थलांतरीत बालकांचा शोध घेतांनाचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण झाल्यावर बालकरक्षकांमार्फत शाळाबाह्य स्थलांतरीत बालकांबाबत यशोगाथा, केस स्टडी, वृत्तपत्र कात्रण संकलीत करुन २७ पर्यंत जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा गोंदिया यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.या भागात घेणार शोधएकही शाळाबाह्य बालक राहणार नाही याकरिता पाच दिवसीय सर्वेक्षणाचे सुक्ष्म नियोजन करावे. १६ ते २० डिसेंबर २०१९ ला शाळाबाह्य मुलांच्या नोंदीचे प्रपत्रामध्ये शाळाबाह्य बालकांची माहिती बालरक्षकांनी भरावी, दडगणखाणी वीटभट्टी काही कालावधी व्यवसाय करण्याकरिता वास्तव्यात असलेले भटके कुटुंब, बांधकाम, रेड लाईट एरिया व तत्सम तसेच भिक मागणारे कुुटुंब, रेल्वे स्टेशन,बस स्टॅन्ड इत्यादी ठिकाणी शोध घेतला जाणार आहे.या दिल्या सूचनाशोध मोहिमेमध्ये आढळलेल्या शाळाबाह्य स्थलांतरीत मुलांना त्वरीत नियमित शाळेत दाखल करुन सदर मुलांचे आधार कार्ड काढण्यात यावे. शाळाबाह्य मुलांची ग्रामीण व शहरी भागातील कधीच शाळेत न गेलेली व मध्येच शाळा सोडलेली सतत ३० दिवस गैरहजर ई व ई-२ विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी,ड्रॉप बॉक्समधील उर्वरित बालकांचा शोध घेण्यात यावे,सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रपत्रे संकलीत २३ डिसेंबर २०१९ ला केंद्रस्तरावर २५ डिसेंबर २०१९ पर्यंत तालुकास्तरावर तसेच २७ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्हास्तरावर प्रपत्र-१ व पपत्र-२ मध्ये संपूर्ण संकलित माहिती समग्र शिक्षा जि.प.गोंदिया कार्यालयात सादर करावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी दिल्या आहेत.
पाच दिवस शोधणार शाळाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली आहे.
ठळक मुद्देदगडखाणी, वीटभट्टींवर घेणार शोध : आॅगस्टमध्ये आढळली होती १० बालके