लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन आणि शिक्षण विभागातर्फे व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे.यामुळे शाळांमध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. पण या नादात खरोखर शोध घेतलेले मुल ही शाळाबाह्य आहेत का याची खात्री करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.असाच प्रकार एकोडी येथे उघडकीस आला. दरम्यान या प्रकाराची शाळेच्या मुख्याध्यापकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.कुडवा येथील जि.प.हायस्कूल (मुले) यांनी काही दिवसांपूर्वी चार शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करुन घेतल्याचे प्रसिध्दी पत्रक काढून सांगितले होते. मात्र जि.प.हायस्कुलने जी मुले शाळाबाह्य दाखविली ती प्रत्यक्षात तालुक्यातील एकोडी येथील साहेबलाल अटरेअनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याचा दावा या शाळेच्या मुख्यध्यापकांनी केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोहेन आझाद बिसेन,अल्ताफ बसुराज शेंडे, बॉबी बसुराज शेंडे, प्रेम राजू शेंडे,जसवंत अमित बिसेन,जॉन अमित बिसेन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी एकोडी येथील शाळेचे नियमित विद्यार्थी आहेत. ८ आॅगस्टला जंतूनाशक दिन आणि १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला सुध्दा या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.त्यांचे छायाचित्र सुध्दा शाळेकडे उपलब्ध आहेत. सदर विद्यार्थी हे रक्षाबंधनासाठी पालकांसोबत गावाला गेले होते. या दरम्यान जि.प.उच्च प्राथमिक शाळा कुडवाने यापैकी चार विद्यार्थ्यांना शाळाबाह्य दाखवून आपल्या शाळेत दाखल करुन घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून म्हटले आहे. शाळेत दाखल असलेल्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य दाखविण्याचा प्रकार दिशाभूल करणारा असून याप्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी एकोडी येथील शाळेच्या मुख्यध्यापकांने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. या तक्रारीची प्रत शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.या प्रकारामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहीमेबद्दल सुध्दा शंका निर्माण झाली आहे.शाळेत दाखल विद्यार्थ्यांना शाळाबाह्य दाखविल्याची तक्रार अद्याप आपल्या विभागाला प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करुन त्यात तथ्य आढळल्यास निश्चितच योग्य कारवाई केली जाईल.- कुलदीपीका बोरकर,समन्वयक सर्व शिक्षा अभियान
शाळेत दाखल विद्यार्थ्यांना दाखविले शाळाबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:16 AM
कुडवा येथील जि.प.हायस्कूल (मुले) यांनी काही दिवसांपूर्वी चार शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करुन घेतल्याचे प्रसिध्दी पत्रक काढून सांगितले होते. मात्र जि.प.हायस्कुलने जी मुले शाळाबाह्य दाखविली ती प्रत्यक्षात तालुक्यातील एकोडी येथील साहेबलाल अटरेअनुसूचित जाती निवासी आश्रम शाळेचे विद्यार्थी असल्याचा दावा या शाळेच्या मुख्यध्यापकांनी केला आहे.
ठळक मुद्देशिक्षण विभागाचा अजब कारभार । जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार