शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

दुबईहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 5:00 AM

तिरोडा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी दुबई येथे गेलेले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते सुध्दा आता आपल्या स्वगृही परतत आहे. काही दिवसांपूर्वी दुबईहून ५० ते ६० जण जिल्ह्यात परतले असून त्यांना गोंदिया येथील स्वागत लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देएकाच दिवशी १४ रुग्णांची नोंद : कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १७ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यातील रोजगारासाठी दुबई येथे गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. शुक्रवारी याच तालुक्यातील दुबईहून परतलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी (दि.१५) पुन्हा दुबईहून परतलेल्या १४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णाचा आकडा आता १७ वर पोहचला आहे. चार दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे दुबई येथून आलेले असून यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.तिरोडा तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी दुबई येथे गेलेले आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते सुध्दा आता आपल्या स्वगृही परतत आहे. काही दिवसांपूर्वी दुबईहून ५० ते ६० जण जिल्ह्यात परतले असून त्यांना गोंदिया येथील स्वागत लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने यासर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी तीन जणांचे स्वॅब नमुने रविवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तर सोमवारी आणखी १४ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुबईहून जिल्ह्यात परतलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे. हे सर्व रुग्ण तिरोडा तालुक्यातील आहे. २१ मे रोजी एकाच दिवशी २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज १५ जून रोजी सर्वाधिक १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला होता.पण दुबईहून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत १३१६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे.क्वारंटाईनमध्ये ठेवल्याने गावात प्रादुर्भाव टळलाकोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना जिल्हा आणि तालुका स्तरावर असलेल्या शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करुन ठेवले जात आहे. दुबईहून जिल्ह्यात परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांना गोंदिया येथील क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे या नागरिकांचा गावकऱ्यांशी संपर्क आला नाही. परिणामी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत झाली.

जिल्ह्यात एकूण ८६ कोरोना बाधितसोमवारी एकाच दिवशी जिल्ह्यात १४ कोरोना बाधित आढळलेल्या जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८६ वर पोहचला आहे. यापैकी आत्तापर्यंत ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले असून ते आपल्या घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १७ अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधित असून त्यांच्या गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर ११४८ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

असा आहे कोरोना बाधितांचा आलेखजिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. २१ मे रोजी २७, २२ मे १०, २६ मे एक, २७ मे १, २८ मे ९, २९ मे ३, ३० मे ४, ३१ मे १, २ जून रोजी २, १२ जून १, १३ जून १, १४ जून १ आणि १५ जून रोजी १४ कोरोना बाधितांची नोंद झाली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या