चांदनीटोला-ओझिटोला प्रभावीत : जिल्ह्यात सध्याही फाईलेरियाचे १ हजार ७८३ रूग्णगोंदिया : जर तपासणीनंतर हत्तीपाय आजाराची टक्केवारी एखाद्या गावात एक टक्केसुद्धा असेल तर ती गंभीर बाब आहे, असे म्हटले जाते. मागील तपासणी अभियानात चांदणीटोला येथे २.६५ व ओझीटोला येथे १.३२ टक्के प्रभाव दिसून आला.चांदनीटोला येथे २ हजार १५४ लोकसंख्या असून १५१ नागरिकांच्या रक्ताच्या नमून्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान चार नमूने दूषित आढळले. याचप्रकारे ओझीटोला येथे ५५० लोकसंख्या असून त्यापैकी २२७ रक्ताच्या नमून्यांची तपासणी करण्यात आली. या गावात तीन रक्ताचे नमूने दूषित आढळले. हत्तीरोगाच्या तपासणीसाठी दरवर्षी एक अभियान राबविण्यात येते. यात काही गावे निश्चित ठरविलेली असतात, त्या गावांमध्ये दरवर्षी तपासणी अभियान राबविले जाते. अशा गावांमध्ये सदर दोन्ही गावांचा समावेश आहे. इतर गावांमध्ये गोंदिया शहरातील वाजपैयी वार्डात तपासणीचे परिणाम ०.३४, लोधीटोला येथे ०.९८, कटंगटोला येथे ०.५६, केऊटोला येथे ०.०० व खर्रा येथे ०.४९ टक्के आढळला. वाजपैयी वार्डात ५०७ रक्त नमून्यांच्या तपासणीत दोन, लोधीटोला येथे ५१२ नमून्यांच्या तपासणीत पाच, कटंगटोला येथे ३६० नमून्यांच्या तपासणीत दोन, केऊटोला येथे ९२ नमून्यांच्या तपासणीत शून्य व खर्रा येथे २०६ नमून्यांच्या तपासणीत रक्ताचा एक नमूना बाधित आढळला. अशाप्रकारे सात गावांमध्ये १७ जण हत्तीरोगाचे रूग्ण आढळले. हत्तीरोगाच्या तपासणीसाठी राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या अभियानाला रेंडम साईट म्हटले जाते. यात नवीन गावांचा शोध घेतला जातो. या वेळी ज्या गावांत हत्तीरोगाचे रूग्ण शोधण्यात आले त्यात तिरोडा येथील डॉ. आंबेडकर वार्डात पाच हजार २४१ लोकसंख्येला आधार समजून ५०९ रूग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले. यात केवळ एक रूग्ण हत्तीरोगाचा आढळला. याची टक्केवारी ०.२० राहिली. तिरोडा तालुक्याच्या खैरबोडी येथे ५०२ लोक व गोंदिया तालुक्यातील आसोली येथील ५०८ लोकांच्या रक्ताच्या नमून्यांची तपासणी करण्यात आली. दोन्ही गावांत एकही रूग्ण आढळला नाही. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या कोरंभी गावात ५०६ रक्त नमून्यांच्या तपासणीत पाच रूग्ण आढळले. टक्केवारी ०.९७ ठरविण्यात आली. चारही ठिकाणांतून सहा रूग्ण हत्तीपायचे रूग्ण आढळले.जिल्ह्यात सदर तपासणी अभियानादरम्यान चार हजार ०९० लोकांपैकी २३ हत्तीपाय आजाराचे रूग्ण आढळले.