सिनेअभिनेता राकेश राजपूत यांचे प्रतिपादन : देव्हाडी येथे आगमन, राणी अवंतीबाई प्रतिमेचे केले पूजनतुमसर : ध्येय व परिश्रम करण्याची जिद्द मनात असले तर यशाचे शिखर निश्चितच गाठता येते. परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी ती अनुकूल करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन हिंदी सिनेसृष्टीतील अर्जून पंडीत, बीग ब्रदर, माँ तुझे सलाम या हीच चित्रपटातील कलावंत राकेश राजपूत यांनी केले.बालाघाट येथे जातानी देव्हाडी येथे राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन करण्याकरिता ते थांबले होते. यावेळी स्थानिक युवकांनी त्यांचा सत्कार केला. हिंदी सिनेसृष्टीत थांबले. त्यांनी सनी देवल यांच्यासोबत अर्जून पंडित, माँ तुझे सलाम, बिग ब्रदर या सिनेम्यात सह अभिनेता म्हणून अभिनय केले आहे. यासोबतच त्यांनी शरीर सौंदर्य स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. राष्ट्रपती पुरस्कार त्यांनी पटकाविले होते. अभिनेते राकेश राजपूत आल्याची माहिती पंचक्रोशीत झाल्यावर शेकडो युवकांनी देव्हाडी येथे धाव घेतली. राणी अवंतीबाईच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सुमारे ४५ मिनिटे ते येथे थांबले होते. राकेश राजपूत यांच्यासोबत गोंदिया जिल्हा लोधी समाज अध्यक्ष राजीव ठकरेले, संदीप नागपूरेसह स्थानिक पदाधिकारी शेखर बिरणवारे, ज्ञानेश्वर बिरणवारे, देवसिंग सव्वालाखे, श्याम नागपूरे, आलमखान, चैनलाल मसरके, जि.प. सदस्य खेमराज पंचबुद्धे, संजय बिरणवारे, शिवप्रसाद लिल्हारे, सुनिता बिरणवारे, सुधीर मसरके, अशोक बन्सोडसह ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
यशासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 2:08 AM