नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यात पाण्याची टंचाई बघता सन २०२१-२२ या वर्षात एकूण ९० हजार ३६९ नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात झालेल्या स्वतंत्र ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांसाठी १८८ गावे-वाड्यांमध्ये १६ हजार १९७ नळ जोडणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अपुरा पाणीपुरवठा असलेल्या ११ गावे-वाड्यांमध्ये २६९४ नळ जोडणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. नवीन योजनांसाठी १०५२ गावे-वाड्यांमध्ये ९७७ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. १० लाख दोन हजार १८३ नळ जोडणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी जिल्ह्यात १०२.२३ टक्के पर्जन्यमान झाले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींमध्ये ८६७ गावे १६०० वाड्या यामधील दोन लाख ५१ हजार ८६७ कुटुंबांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोडणीपैकी नळ जोडणी व खासगी स्रोत मिळून एक लाख ६१ हजार ४९८ उद्दिष्ट पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत ९० हजार ३६९ नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पहिल्या टप्यात उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. टप्पा-२ अंतर्गत एकूण १०१ उपाययोजनांसाठी ५६ लाख ६४ हजार रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. टप्पा-३ अंतर्गत १६४७ उपाययोजनांसाठी पाच कोटी ८९ लाख १० हजारांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. दोन्ही आराखड्याच्या १७४८ उपाययोजनांसाठी सहा कोटी ४५ लाख ७४ हजार रुपयांची मंजुरी प्राप्त आहे. त्यापैकी नवीन विंधन विहीर घेणे २८ कामे, नळयोजना विशेष दुरुस्तीची ८ कामे, सार्वजनिक विहीर खोलीकरण व गाळ काढणे इनवेल बोअर करण्याच्या ४६ कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त कामांपैकी नवीन विंधन विहीर घेणे कामे प्रगतिपथावर आहेत.
बॉक्स
प्रादेशिक पाणीपुरवठा १३४ गावांमध्ये
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकरीता पूर्ण झालेल्या २० योजनांसाठी १३४ गावे-वाड्यांमध्ये २४ हजार ४९१ नळ जोडणी प्रस्तावित करण्यात आल्या आहे. प्रगतीवर असलेल्या ३ योजनांपैकी १३ गावे-वाड्यांमध्ये १७३९ नळजोडणीचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्याव्यतिरिक्त ३८ नवीन योजना १०३ गावे-वाड्यांमध्ये प्रस्तावित आहेत. १५ हजार ६१५ नळजोडणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
.....................
बॉक्स
४३ योजनांना कार्यारंभ आदेश
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४३ योजनांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४३ योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. ४१ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. १९ योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद तत्पर आहे.