गोंदियात होते ७०० एजेंट : चार राज्यातील खातेदारांच्या ठेवीगोंदिया : पाच व सहा वर्षात दामदुप्पट करून देण्याच्या नावावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश या चार राज्यातील खातेदारांकडून ५३ कोटी वसूल करून पीएसीएलच्या गोंदिया शाखेने त्यांना मॅच्युरिटी दिली नाही. परिणामी या प्रकरणात तक्रार करण्यासाठी चंद्रपूरच्या चार महिला पुढे आल्या. त्यांच्या ठेवीची रक्कम २२ लाख येत असली तरी विविध खातेदारांकडून घेतलेल्या ५३ कोटी रकमेची परतफेड केली अद्यापही केली नाही. पाच वर्षात दामदुप्पट करून देण्याच्या नावावर पीएसीएल इंडिया लिमीटेड या कंपनीची शाखा गोंदियात १९९८ पासून सुरू झाली. या कंपनीने सुरूवातीपासून सन २०१२ पर्यंत असलेल्या सर्व ग्राहकांना नियमीत मॅच्युरिटी दिली आहे. त्यानंतरच्या खातेदारांना मॅच्युरिटी दिली नसल्याने २०१३ पासून आतापर्यंतच्या मॅचुरिटी झालेल्या ग्राहकांना त्यांचा पैसा देण्यात आला नाही. या पीएसीएल कंपनीने ५३ कोटीचा गंडा केल्याची माहिती आहे. या कंपनीशी ७०० एजेंट जुळलेले असून त्या एजेंटानी मध्यप्रदेशचा बालाघाट, मलाजखंड, छत्तीसगडचा राजनांदगाव, डोंगरगड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यातील हजारो खातेदारांना मॅच्युरिटी दिली नाही. (तालुका प्रतिनिधी)देशभरात ४५ हजार कोटीचा अपहारपीएसीएलने देशभरातील ग्राहकांकडून जमा केलेली रक्कम ४५ हजार कोेटींच्या घरात आहे. त्यामुळे पीएसीएलच्या संचालक मंडळावर दिल्लीच्या सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभागाने) गुन्हा दाखल केला आहे. पीएसीएलमध्ये ठेवलेले पैसे कधी मिळणार याकडे ठेवीदारांचे लक्ष आहे. लुटणाऱ्या आणखी कंपन्या गोंदियातगोंदिया जिल्हावासीयांना लुटणाऱ्या आणखी काही कंपन्या गोंदियात आहेत. खातेदार वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारून पॉलीसी विड्राल करण्याची मागणी करीत असताना ते त्या खातेदारांना आज, उद्या करीत वेळकाढू धोरण राबवित आहेत. त्यासाठी लोकांना गंडविणाऱ्या कंपन्याच्या विरोधात कारवाई होणे अपेक्षित आहे. यासाठी ठेविदारांनी पुढे येण्याची गरज आहे.
पीएसीएल कधी देणार ग्राहकांचे ५३ कोटी
By admin | Published: February 20, 2017 12:49 AM