वडेगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तब्बल ७ महिन्यांनंतर पूर्व विदर्भातसह कोकणातील शेतकऱ्यांसाठी बोनसची रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.
राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना देऊ केलेली ४७० कोटींची सानुग्रह अनुदान (बोनस) राशी बुधवार ३० जून रोजी मंजूर केली. परंतु केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तूर्तास केवळ ५० टक्केच रक्कम वितरण करण्याचे पत्रक महाराष्ट्र राज्य पणन संघाचे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर यांनी गुरुवारी काढले. पूर्व विदर्भासह कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासकीय यंत्रणेमार्फत धानाची खरेदी केली जाते. परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला असलेली आधारभूत किंमत अल्प असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धानाला प्रति शेतकरी ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल ७०० रुपये सानुग्रह अनुदान देत आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दुप्पट म्हणजेच २५६८ रुपये प्रतिक्विंटल दर यंदा मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केंद्रावर धान विक्री केले. गोंदिया जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ५४० शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ५० टक्के बोनस दुसऱ्या टप्प्यात येत्या १५ दिवसात देण्यात येणार आहे.
030721\screenshot_20210703-171651_chrome.jpg
शासनाचे पत्र