धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आता कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागणार नाही. तर हमीभावाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करुन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शासकीय धान खरेदीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागातील शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू व्हावीत यासाठी माजी आमदार जैन हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत रब्बीसाठी एकूण ११४ शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. जस-जशी गोदाम उपलब्ध होतील तस-तशी धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. धान खरेदीला सुरुवात करताना आमदार जैन यांच्यासोबत राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, कैलाश पटले, नीता रहांगडाले, योगेंद्र भगत, किशोर पारधी, सरपंच चेतना कोल्हटकर, यादव बिसेन, सुखदेव बिसेन, किरण हंसोड़, वाय. डी. बिसेन, धनराज पटले, गोविंद ठाकरे, गणराज बिसेन, दीपा वाघाडे, प्रमिला कटरे, खुमान रहांगडाले, संजय गुणेरीया, किसन बनकर, नक्टु कटरे, संतोष कटरे उपस्थित होते.
बेरडीपार येथील केंद्रात धान खरेदी सुरू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:32 AM