लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात यशस्वीपणे वावरण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यामुळे यशाचे शिखर गाठणे सुध्दा शक्य होते. नेमकी हिच बाब हेरून तालुक्यातील पद्मपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या शाळेला सध्या विज्ञानाचे वेध लागल्याचे चित्र आहे.आधुनिक जगात विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगतीशील वाटचाल केली आहे. विज्ञान तंत्रज्ञानातून नाविण्यपूर्ण अभ्यासक्रमाचे धडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे. यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचे ज्ञान शाळेतून देण्यासाठी शिक्षण विभागाने उपक्रम सुरू केला आहे. पदमपूर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना याच उपक्रमातून विज्ञानाचे वेध लागले आहे. तंत्रज्ञानाचा शोध लावण्यासाठी आवश्यक बाबी, आजची जीवनशैली तसेच जीवनसृष्टी व परिसर यावर शोधाचा परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातून मिळावी. याच शिक्षणातून विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढवून विज्ञानाप्रती त्यांचा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी नाविण्यपूर्ण विज्ञान अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पदमपूर येथे मुख्याध्यापक शरद उपलपवार, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, समग्र शिक्षण विभागाचे दिलीप बघेल, गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर, केंद्र प्रमुख एम.एम. राऊत, विज्ञान शिक्षक श्रृती चटर्जी यांच्या प्रयत्नाने शाळेत नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली. नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसीत करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्रात विज्ञान शिक्षण साहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, मानवीय प्रतिकृती, आंतर इंद्रीयांचे प्रात्याक्षीक व इतर साहित्य, दर्शनिक चित्रे, बोधपत्र अशा विविध साहित्याच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाचे धडे मिळण्यास मदत होत आहे.सदर नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राच्या सहाय्याने शैक्षणिक अभ्यासप्रमाणेच शाळेत प्राधान्य मिळाल्याने शिक्षक श्रृती चटर्जी, शारदा जिभकाटे, लोकचंद बारई, शालीनी तुरकर,शोभा मच्छिरके, सोनल अग्नीहोत्री, शालीकराम तलमले, हंसलाल टेंभरे, अनिता मानकर यांनी नाविण्यपूर्ण अभ्यासक्रमाला पायाभूत अभ्यासक्रमातून अवगत करण्याची संकल्पना राबविली आहे.शाळेतील विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना बळ मिळून विज्ञानाचे पाऊले उचलण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रीया विस्तार अधिकारी रामटेके यांनी दिली.चैतन्य ब्राह्मणकरने बनविले कुलरचे मॉडेलनाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राच्या अभ्यासक्रमातून प्रेरक शोध वृत्ती बाळगून चैतन्य ब्राम्हणकर या वर्ग सहाच्या विद्यार्थ्याने कुलरचे आधुनिक मॉडल तयार केले. मॉडल तयार करताना त्याने स्वस्त साहित्य आणि विजेची बचत कशी करता येईल यावर भर दिला. त्याने विज्ञान केंद्रातील अभ्यासक्रमाचा बोध घेत सदर मॉडल तयार केले असल्याचे सांगितले.
पद्मपूर शाळेला लागले नावीन्यपूर्ण विज्ञानाचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:06 PM
सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या युगात यशस्वीपणे वावरण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. यामुळे यशाचे शिखर गाठणे सुध्दा शक्य होते. नेमकी हिच बाब हेरून तालुक्यातील पद्मपूर येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देण्यास सुरूवात केली आहे.
ठळक मुद्देग्रामीण भागात तयार होत आहेत वैज्ञानिक : प्रेरित होऊन तयार केले मॉडेल