गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची आढावा बैठक येथील रेलटोली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भवन येथे बुधवारी (दि. २१) घेतली.
बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व माजी खासदार खुशाल बोपचे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय आढावा घेण्यात आला व पक्ष संघटना, बुथ समितीचे सक्षक्तीकरण, जिल्हा परिषदनिहाय पक्षाचे प्राबल्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर पडोळे यांनी, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मजबुतीने सामोरे जाऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. गावातील बूथ कमिटीचे गठन किंवा नूतनीकरण करीत जास्तीत जास्त युवक-युवती व नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम करावे, असे सांगितले.
बैठकीला नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, शिव शर्मा, देवेंद्रनाथ चौबे, डॉ. अविनाश काशिवार, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, योगेंद्र भागत, प्रेम रहांगडाले, कमलबापू बहेकार, रजनी गिर्हेपुंजे, छाया चव्हाण, रजनी गौतम, नेहा शेंडे, विशाल शेंडे, अशोक शहारे, रफिक खान, नामदेव डोंगरवार, सी. के. बिसेन, गोपाल तिराले, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.