शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

किराणा दरवाढीने गृहिणींची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:27 AM

गोंदिया : पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले असून ...

गोंदिया : पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी सर्वच वस्तूंचे दर वाढत चालले असून महागाईचा भडका उडत आहे. वाहतुकीचा खर्च वाढत चालल्याने सर्वच वस्तूंचे दर वधारत असतानाच खाद्यपदार्थांवरही याची झळ बसत असून किराणा मालही भडकला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून घर कसे चालवावे असा प्रश्न त्यांना पडत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरावरच अन्य सर्व वस्तूंचे दर अवलंबून असतात. पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यास वाहतुकीचा दर कमी होतो, तर यांचे दर वाढल्यास वाहतुकीचा दर वाढतो. परिणामी मालाची वाहतूक करण्यावर येणारा खर्च वाढत असून त्यानुसार मालाचे दर ठरविले जातात व यालाच महागाई वाढली असे म्हटले जाते. मागील वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून यामुळेच आता किराणा मालासह अन्य सर्वच वस्तूंचे दर वधारत चालले आहेत. वर्षभरात डिझेल ३० टक्के, तर किराणा ४० टक्क्यांनी महागला असल्याचे ऐकिवात आहे.

------------------------------

गृहिणी

महागाईमुळे आता दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. किराणा दरवाढ बघता काय खावे असा प्रश्न पडतो. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर वधारले आहेत. तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. अशात काय बनवावे व काय खावे याचा दररोज विचारच पडतो.

- राजश्री रहिले (गृहिणी)

---------------------

महागाईमुळे नाकीनऊ आले आहे. प्रत्येकच वस्तूचे दर वधारत चालले आहेत. खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे दर वधारत असल्याने सर्वसामान्यांवर आता उपाशी राहण्याची पाळी आली आहे. तेलापासून ते अन्य किराणा मालाचे दर बघता घरचे बजेट कोलमडून पडले आहे. शासनाने सर्वसामान्यांचा विचार करण्याची गरज असून महागाई नियंत्रणात आणावी.

- नेहा भूते (गृहिणी)

-------------------------------------

व्यापारी प्रतिक्रिया

वस्तूंच्या दरवाढीसाठी वाहतुकीसोबतच उत्पादन व वितरण तसेच शासकीय धोरण हेसुद्धा जबाबदार असते. यामुळे शासनाने यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. किरकोळ व थोक विक्रेत्यांची यात काहीच भूमिका नसते. त्यात आता प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार सुरू असून हे थांबविण्याची गरज आहे.

- लक्ष्मीचंद रोचवानी

अध्यक्ष, थोक किराणा व्यापारी संघटना

---------------------------

तेलही महागले (दर प्रती लिटर)

तेल मार्च २०२० सप्टें.२०२० मे २०२१

शेंगदाणा १८० १८५ १९०

सुर्यफूल १८० १८० १८०

करडी १८० १८० १९०

सोयाबीन १५० १५५ १६०

पामतेल १५० १५५ १६०

----------------------------------------------

किराणा दर (प्रती किलो)

माल मार्च २०२० सप्टें.२०२० मे २०२१

तूरडाळ १०० ११० ११०

हरभरा डाळ ६५ ७० ७०

तांदूळ ५२ ५२ ५५

साखर ३५ ३५ ३६

गुळ ४० ४५ ४०

बेसन ७५ ७५ ८०

--------------------------

डिझेल दर (भाव प्रती लिटर)

डिझेल जानेवारी २०२० जून २०२० जानेवारी २०२१ मे २०२१

८३.३८ ९३.०९