पावसाळ्यात पानगाव- सोनपुरी रस्ता चिखलात जातो. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर ३-४ वेळा अपघात होऊन काही जणांना अपंगत्व सुद्धा आले आहे. सोनपुरी हे गाव मोठे असून येथे साप्ताहिक बाजार भरतो. शिवाय येथे १ ली ते १२ वीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तलाठी कार्यालयासह अनेक कामानिमित्त नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. शिवाय याच रस्त्याने शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यासह बहेला, खेडेपार, नवेगाव, बाह्मणी, पाथरी, सोनपुरी, पांढरी, कहाली, निंबा, पिपरिया, पठाणटोला, पाऊलदौना, रामाटोलासह अनेक गावातील नागरिकांची ये-जा असते. हा रस्ता राज्य महामार्गाला जोडणारा असून या रस्तावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मागील अनेका वर्षांपासून करण्यात आली आहे. स्थानिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्ता खड्ड्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:33 AM