गोठणगाव : गेल्या पाच दिवसांपासून बिबट घरात घुसून दहशत निर्माण करीत आहे. १२ आॅगस्ट रोजी गोठणगाव येथील मधुकर निकोडे यांच्या घरी घुसून बोकड मारण्याच्या तयारीत असताना कुत्र्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे घरातील लोक जागे झाले व बिबट पळून गेला. मात्र कुत्र्याला जखमी केले. १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान मुरली तुलावी यांच्या घरी बिबट घुसला. लोकांचे आवागमन सुरू होते. बिबट दिसताच लोक लाठ्याकाठ्या घेऊन जमा झाले. बिबट्याने एका व्यक्तीच्या टांगेतून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. याप्रकरणी वनपाल सचिन ठाकरे यांनी सांगितले की, गावात बिबट्याची दहशत असल्याचे माहित झाले. त्यामुळे मी व आम्ही १३ आॅगस्ट रोजी रात्रीला पाळत ठेवली. परंतु आम्हाला दिसला नाही. १४ च्या पहाटे रेंज क्वार्टरच्या मागे बिबट ओरडत होता, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)
बिबट्यांचा धुमाकूळ गावात दहशत
By admin | Published: August 18, 2016 12:19 AM