लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. परिणामी खासगी शाळांकडून पालकांची होणारी लूट आता थांबणार असल्याचे दिसते. यामुळे एनएसयुआयच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली असून पालक व विद्यार्थ्यांची ही बल्ले-बल्ले आहे.खासगी इंग्रजी व सीबीएसई शाळांकडून अवाढव्य शिक्षण शुल्क घेतले जात आहे. शिवाय वह्या-पुस्तके व गणवेशही जास्त दराने पालकांना तेथूनच घेण्याची सक्ती केली जाते. एकंदर खासगी शाळांकडून पालकांची मोठ्या प्रमाणात लूटच सुरू आहे. आज खासगी शाळांच्या मनमर्जी कारभारामुळे सामान्य व्यक्तीला आपल्या पाल्यांना शिकविणे अत्यंत कठीण झाले आहे. खासगी शाळांच्या या मनमर्जी विरोधात एनएसयुआय जिल्हाध्यक्ष हरिष तुळसकर यांनी आमरण तर त्यांच्या समर्थनार्थ पालकांनी गुरूवारपासून (दि.६) साखळी उपोषण सुरू केले होते. विशेष म्हणजे, त्यांच्या उपोषणाची दखल घेत शिक्षणाधिकाºयांनी शाळांच्या चौकशीचे पत्र त्यांना दिले होते. मात्र एवढ्यावरच समाधान न झाल्याने हे उपोषण सुरूच होते.या प्रकाराकडे लक्ष देत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मध्यस्थी करीत एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला घेऊन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी एनएसयुआयच्या मागण्या मान्य करीत शिक्षणाधिकाºयांना कारवाईचे निर्देश दिले. आता जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिल्यामुळे शाळांची चौकशी होणार असून शाळांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर अंकुल लागणार असल्याचे दिसते. यामुळे पलाक वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.या आहेत प्रमुख मागण्याएनएसयुआयने चर्चे दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांना मागण्यांचे पत्र दिले आहे. त्यात, प्रत्येक खासगी शाळेत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरील अधिकाºयांच्या उपस्थितीत पालक-शिक्षक संघाचे गठन करावे, प्रत्येक शाळेत सभा घेवून पालक-शिक्षक संघाचे अधिकार व कायदे यांची माहिती द्यावी, शाळेत गणवेश, वह्या-पुस्तक व अन्य शैक्षणिक साहित्यांची विक्री बंद करून आदेशाचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाई करा, शाळांकडून घेतले जाणारे शिक्षण शुल्क व कोणताही आर्थिक व्यवहार रसीद बुकवर व्हावा, विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणारे अनावश्यक विषय शिकविणे बंद करून त्यांचा मानसिक व दप्तरांतील पुस्तकांचा बोजा कमी करावा, सीबीएसई शाळांत फक्त एनसीईआरटीच्याच पुस्तकांचा वापर करून खासगी प्रक ाशनाच्या पुस्तकांचा वापर बंद करा, शिक्षकांची पात्रता तय करून शिक्षण विभागाकडून मान्य झाल्यावरच त्यांची नियुक्ती करावी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना शिकविण्याची मंजुरी द्यावी, सीबीएसईच्या नावावर सुरू असलेल्या शाळांचा व्यापार बंद करून कठोर कारवाई करावी, शाळांत विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, मुलींसाठी प्रसाधनगृहात महिला कर्मचारीची व्यवस्था असावी, अनधिकृत १७ शाळांच्या संचालकांवर कारवाई करावी, लेट-फीस बंद करून शिक्षण शुल्क वसुल करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणे, अपमान करणे, स्पर्धांत भाग घेवू न देणे हे प्रकार बंद करावे, शाळांकडून विद्यार्थ्यांचा टिफीन मेन्यू निर्धारित केला जावू नये, प्रत्येकच शाळा मे व जून महिन्यात बंद असावी या मागण्यांचा समावेश आहे.लिंबू पाणी पाजून उपोषणाची सांगताआमदार अग्रवाल यांच्या मध्यस्थीनंतर जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेने हा प्रश्न सुटला. यामुळे पालक व कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण होते. परिणामी, आमदार अग्रवाल यांच्या हस्ते तुळसकर यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली. याप्रसंगी आलोक मोहंती, गौरव वंजारी, संदीप ठाकूर, विन्नी गुलाटी, शिलू ठाकूर, दिपीका रूसे, श्वेता पुरोहित, सुनील तिवारी, पराग अग्रवाल, भागवत मेश्राम, पूजा तिवारी, ममता सोमवंशी, माही मक्कड, गीता सोमवंशी, सीमा बैस, छाया मेश्राम, मोसमी भालाधरे, रूपाली ठाकूर, सिनू राव, मयूर मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक व पालक उपस्थित होते.
पालक व विद्यार्थ्यांची बल्ले-बल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 10:08 PM
खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
ठळक मुद्देखासगी शाळांच्या मनमर्जीवर लागणार अंकुश : एनएसयुआयच्या उपोषणाचे फलीत