केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवोदय विद्यालय केशोरी येथील मृणाल गुणवंत पेशने व जिल्हा परिषद शाळा सडक अर्जुनीची विशाखा लेखराम मुनीश्वर या विद्यार्थ्याची महाराष्ट्र राज्य स्तरीय बाल परिषदेसाठी निवड झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
बाल परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून तंबाखू, गुटखा,मावा विडी सिगारेट तपकीर यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावीपणे आपली मत मांडणाऱ्या,तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या भागातील बोलीभाषेत आपल्या परिसरातील लोकांना समजून देणाऱ्या, तंबाखूजन्य पदार्थबाबत परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या, आपल्या वर्गातील शाळेतील आपल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना जागृत करणाऱ्या आणि व्यसनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न मनात बाळगलेल्या ध्येयवेड्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रभावी असा समूह निर्माण करून त्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या चळवळीला वेग देण्याचा संकल्प मनामध्ये ठेवून सलाम मुंबई फाऊंडेशन कार्य करीत आहे. बाल परिषदेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून तंबाखू, गुटखा, मावा विडी सिगारेट तपकीर यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावीपणे आपली मत मांडणाऱ्या, तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम आपल्या भागातील बोलीभाषेत आपल्या परिसरातील लोकांना समजून देणाऱ्या, तंबाखूजन्य पदार्थाबाबत परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या, आपल्या वर्गातील शाळेतील आपल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना जागृत करणाऱ्या आणि व्यसनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न मनात बाळगलेल्या ध्येयवेड्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा प्रभावी असा समूह निर्माण करून त्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या चळवळीला वेग देण्याच्या संकल्प मनामध्ये ठेवून सलाम मुंबई फाऊंडेशन कार्य करीत आहे. त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवू या बालचमूची टीम उभी करत आहे. यशस्वीतेसाठी सलाम मुंबईचे स॑देश देवरूखकर, आरोग्य प्रबोधिनीचे डाॅ. सूर्यप्रकाश गभने, मुख्याध्यापक एन. एस.कडगाये, भास्कर नागपुरे, सहायक शिक्षक नितीन लांजे, आरती पुराम प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद शाळा सडक अर्जुनीची विशाखा मुनिश्वर या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्यस्तरीय बाल परिषदेसाठी निवड झाली आहे.