शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

एक्स्प्रेसमुळे पॅसेंजर चार तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 9:48 PM

चांदाफोर्ट-गोंदिया ही प्रवासी रेल्वे रोज धावते. पण शनिवारी (दि.२०) सायंकाळी एक्स्प्रेसमुळे ६८८०१ क्रमांकाची ही गाडी तब्बल चार तास उशिरा आली. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, अनेक विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक प्रशिक्षण करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मजुरांची चांगलीच अडचण झाली.

ठळक मुद्देचांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे : विलंबामुळे नागरिक व कर्मचाऱ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : चांदाफोर्ट-गोंदिया ही प्रवासी रेल्वे रोज धावते. पण शनिवारी (दि.२०) सायंकाळी एक्स्प्रेसमुळे ६८८०१ क्रमांकाची ही गाडी तब्बल चार तास उशिरा आली. यामुळे दररोज प्रवास करणारे नागरिक, अनेक विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक प्रशिक्षण करणारे प्रशिक्षणार्थी तसेच मजुरांची चांगलीच अडचण झाली.चंद्रपूर मार्गावर दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चांदाफोर्ट-गोंदिया ही पॅसेंजर सुविधाजनक ठरत असल्याने नागरिक याच गाडीने आपल्या कामानिमित्त ये-जा करतात. मात्र शनिवारी (दि.२०) वैनगंगा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि सुरक्षा जवानांची विशेष गाडी धावल्याने या पॅसेंजर गाडीला चार तास उशिराधावावे लागले. बाराभाटीत या गाडीची येण्याची वेळ सायंकाळी ५.४६ वाजता असताना शनिवारी ही गाडी रात्री ९.४९ वाजता आली. या रेल्वे स्थानकावरून तेंदूपत्ता संकलन व बोद भराईच्या कामासाठी जात असलेल्या मजुरांसह अन्य प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.या रेल्वे मार्गावर अनेक अडचणी नागरिकांना सोसाव्या लागतात. बºयाच वेळा इंजन फेल होतात, अनेक वेळा रुळ तुटले, अनेक स्थानकांवर पुरेशा सोयी नाहीत, बसायची व्यवस्था नाही.या मार्गावरुन अनेक मार्गासाठी गाड्या धावतात. एक्स्प्रेससाठी नेहमीच पॅसेंजर गाडीला थांबवून ठेवले जाते. आपले काम आटोपून घरची वाट धरणाºया नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो.गाडीचे डबे वाढवाउन्हाळ्यात लग्नसराई असते यामुळे लग्नाची खरेदी करायला नागरिकांची ये-जा सुरू आहे. याशिवाय आपापल्या कामानिमित्त सर्वांनाच या गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे गाड्या भरभरून वाहत आहे. मात्र या मार्गावरील गाड्यांना मोजकेच डबे आहेत. त्याचप्रमाणे ७८००२ या मेमोला तर फारच गर्दी बघावयास मिळत आहे. सदर मेमो सकाळी गोंदियावरुन १०.२० ला सुटत असून तिला फक्त पाच डबे असतात. मात्र प्रवाशांची गर्दी बघता गाडीला सुमारे १० डबे असणे आवश्यक आहे. तसेच सकाळच्या गोंदिया-चांदा फोर्ट गाडीतही नेहमीच गर्दी असते. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे डबे वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.थांब्याची वेळ वाढवाचांदाफोर्ट-गोंदिया मार्गावरील गाड्यांत खूप गर्दी आहे. अशावेळी लहान स्थानकावर रेल्वेपासून तीन फूट स्थानकाची जागा असते. अशा प्रकारामुळे व गर्दीमुळे म्हाताºया व बालकांना चढायला-उतरायला फारसे जमत नाही व प्रवासी पडतात. यात कित्येक जखमी होतात तर काहींचा जीवही जातो. करिता गाड्यांच्या थांब्याची वेळ वाढविण्याची मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी, बोळदे, ब्राह्मणटोला आदी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे