शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सन्माननीय पगारवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:00 AM

युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका अनेक ग्राहकांना सुध्दा बसला.

ठळक मुद्देबँक कर्मचाऱ्यांची मागणी : शुक्रवार व शनिवारी कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन्माननीय पगारवाढ द्या यासह अन्य मागण्यांना घेऊन युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकरण्यात आले आहे. यांतर्गत, शुक्रवारी (दि.३१) बँक कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँकसमोर नारेबाजी करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनांतर्गत आता शनिवारी (दि.१) शासकीय बँकांत कामबंद राहणार आहे.सन्माननीय पगारवाढ द्या, ५ दिवसांचा आठवडा, स्पेशल अलाऊंस मुळ पगारात समाविष्ट करावा, नवीन पेंशन योजना रद्द करावी, महागाई भत्ता मुळ पेंशनमध्ये समाविष्ट करून पेंशनची पुनर्रचना करावी, फॅमिली पेंशनमध्ये पुरेशी वाढ करावी, कार्यरत नफ्याशी निगडीत कर्मचारी कल्याण योजना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभावर आयकर लागू करू नये, कामकाजाची वेळ व मध्यंतर यात सुसूत्रता आणावी,लिव्ह बँक योजना लागू करावी, अधिकारी वर्गाचे कामाचे तास निधार्रित करावे, कंत्राटी कर्मचारी तसेच बिझनेस करस्पॉंडंट यांना नियमित कर्मचारी एवढाच पगार द्यावा आदी मागण्यासाठी युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यांतर्गत, शुक्रवारी (दि.३१) कर्मचाऱ्यांनी येथील स्टेट बँक समोर नारेबाजी करून आपल्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला.या आंदोलनांतर्गत शनिवारीही (दि.१) शासकीय बॅँकांत कामबंद आंदोलन राहणार आहे. या आंदोलनामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच फजीती झाल्याचे दिसले.कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्पयुनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका अनेक ग्राहकांना सुध्दा बसला.असा आहे आंदोलनाचा टप्पायुनियनच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत सध्या ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर ११, १२ व १३ मार्च रोजी कामबंद आंदोलन केले जाईल. यावरही मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे.

टॅग्स :bankबँकStrikeसंप