लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : पंचायत समिती व तहसील कार्यालय तिरोडा अंतर्गत येणाºया नवेझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम ११ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू आहे. मात्र मजुरांच्या खात्या अद्याप पगार जमा न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांच्या नावे तिरोडाचे नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना निवेदन देवून मजुरांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली.नवेझरी येथे तलाव खोलीकरणाचे मागील दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. यात जवळपास २०० ते ३०० मजुरांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला नाही. आधीच दोन वर्षांच्या दुष्काळामुळे त्यांची स्थिती हलाखीची झाली आहे. शेतकरी व शेतमजूर संपूर्ण कुटुंबासह तलाव खोलीकरणाच्या कामावर जात आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे ते मजुरीची वाट पाहत आहेत. खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवेझरी ते तिरोडा येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदार व खंड विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. तसेच निवेदन दिल्यानंतर आठ दिवसांत मजुरांच्या खात्यात पगार जमा करण्यात आला नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे महेंद्र भांडारकर, मुरपारचे सरपंच राजेंद्र फाये, पविंद्र उके, उरकुडा उके, गोपाल शेंडे, नरेश शहारे, मनोहर शेंडे, मुरलीधर चोपकर, तिर्थराज बावणथडे, योगिराज उके, विनोद हरडे, प्रकाश सोयाम, मानिक उके, कैलाश इनवाते, बारेवार आदी उपस्थित होते.
रोहयो मजुरांना पगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:18 AM
पंचायत समिती व तहसील कार्यालय तिरोडा अंतर्गत येणाºया नवेझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे काम ११ नोव्हेंबर २०१७ पासून सुरू आहे. मात्र मजुरांच्या खात्या अद्याप पगार जमा न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
ठळक मुद्देउपासमारीची पाळी : शिवसेनेचे जिल्हाधिकाºयांना निवेदन