लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कबीरपंथी संत रामपाल महाराज यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता शहरातून शांतता रॅली काढली. तसेच त्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.रामपाल महाराज यांच्यावर लावण्यात आरोप व गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी संपूर्ण देशभर रविवारी त्यांच्या समर्थकांनी शांतता रॅली व निदर्शने करुन काळा दिवस पाळला. पोलिसांनी रामपाल महाराजांवर हत्येचे खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. रामपाल महाराजांनी सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रीय समाज सेवा समिती गठीत केली आहे.या समितीच्या माध्यमातून रामपाल महाराज यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची निपक्ष चौकशी करुन योग्य न्याय देण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या समर्थकांच्या वतीने रविवारी शहरातील मुख्य मार्गावरुन शांतता रॅली काढण्यात आली.त्यानंतर जयस्तंभ चौकात निदर्शने करुन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रॅलीमध्ये रामपाल महाराज यांचे समर्थक सहभागी झाले होते. रॅलीचे नेतृत्त्व उमाकांत ढोमणे, आनंद दमाहे, तिलकचंद गराडे, हौसलाल दशारिया, राधेलाल साठवने यांनी केले.
रामपाल महाराज यांच्या समर्थनार्थ शांतता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 9:31 PM
कबीरपंथी संत रामपाल महाराज यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता शहरातून शांतता रॅली काढली. तसेच त्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करुन उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : आरोप मागे घेण्याची मागणी