१३० गरीब विद्यार्थ्यांना वाटप : गणेशोत्सवातील उपक्रमगोंदिया : मनोकामना पूर्ती केल्यास भक्तांकडून देवाला विविध वस्तू, पदार्थ भेट दिल्या जातात. परंतु गणपतीला साकडे घालताना किंवा वर्गणी म्हणून भेट देताना वह्या, पेन, पेन्सील, कटर देण्याची मागणी केली. त्यानुसार बाल गणेश उत्सव मंडळ गड्डाटोली गोंदिया येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी एक पेन, एक वही वर्गणी स्वरूपात दिल्या.दहा दिवसात गणपती उत्सवात भेट देणाऱ्या भाविकांनी २६० वह्या, २६० पेन, २२० पेन्सील व २२० कटर गोळा केले.गोळा झालेले हे शैक्षणिक साहित्य झोपडपट्टीतील २० बालकांना, न.प. हिंदी प्राथमिक शाळा रेलटोली येथील ४७ विद्यार्थ्याना, न.प.मराठी प्राथमिक शाळा रेलटोली १०, न.प. हिंदी प्राथमिक शाळा रामनगर ४०, न.प. मराठी प्राथमिक शाळा रामनगर १३ अश्या एकूण १३० गरीब विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी स्वप्नील अग्रवाल, श्रृती अग्रवाल, बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतिक सुकारे, भूषण यादव, सुभाष सोसे, राज व सतीश यांनी पुढाकार घेतला होता. (तालुका प्रतिनिधी)
अन् वर्गणीतून मागितल्या वह्या, पेन
By admin | Published: September 26, 2016 1:48 AM