लोकमत न्यूज नेटवर्कइटखेडा : अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने इटखेडा येथे फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.ग्रामस्तरावर छोट्या कारणावरुन होणारे वादविवाद, पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी, त्यामुळे निर्माण होणारी अशांतता व वैरभाव, पोलीस प्रशासन व प्रसंगी न्याय व्यवस्था इत्यादीवर पडणारा ताण आणि होणारा वेळ व पैशाचा अपव्यय यातून मुक्त होण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाकडून फिरते पोलीस ठाणे हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणेदार शिवराम कुमरे यांच्या कुशल मार्गदर्शनात ग्राम इटखेडा येथे ७ जुलै रोजी फिरत्या पोलीस ठाण्याचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी सदर उपक्रमासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. या उपक्रमासाठी आलेले सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुमरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे, आनंदराव इस्कापे, महेंद्र सोनवाने, विजय कोटांगले व पुष्पा पोवनकर यांचे स्वागत तंमुस अध्यक्ष मोरेश्वर भावे, सरपंच अश्विन कोडापे व पोलीस पाटील विकास लांडगे यांनी केले.ग्राम इटखेडा येथे अर्जुनी-मोरगाव फिरत्या पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांसमोर तंमुसने त्यांच्याकडे आलेल्या शेतशिवार, धुºयांची बांधणी, घराच्या पाणी वाहून जाण्याची समस्या, घराच्या सीमेवरील कुंपन याबाबतचे आपापसामध्ये होणारे विवाद याबाबद आलेले अर्ज मांडले. वादीप्रतिवादीचे म्हणणे समजून घेत सर्वांच्या सहकार्याने आलेल्या पाच प्रकरणांचा निपटारा करण्यात यश आले.याप्रसंगी मोरेश्वर भावे, अश्विन कोडापे, विकास लांडगे, हिमानी गोठे, पुंडलिक धोटे, शालिकराम भावे, अश्विन कोडापे, विकास लांडगे, हिमानी गोठे, पुंडलिक धोटे, शालिकराम सुखदेवे, विश्वनाथ गोठे, राकेश शेंडे, समिर गोंडाणे, यादोराव गोठे, इस्तारी वासनिक, जयदेव मेश्राम, तुुलशीदास गोंडाणे, बब्बुमिया शेख, वासुदेवराव उके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर फिरत्या पोलीस ठाण्याच्या नाविण्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:29 PM
अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने इटखेडा येथे फिरत्या पोलीस ठाण्याचा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.
ठळक मुद्देपाच प्रकरणांचा निपटारा : आपसी समन्वय व तडजोडीतून वेळ व पैशाचा अपव्यय टाळा