शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

खोटी आश्वासने देणाºयांना जनतेने धडा शिकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:21 PM

जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्रा.पं. निवडणुकीत सर्वाधिक जागांचा दावा

गोंदिया : जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस समर्थीत सर्वाधिक उमेदवार निवडून आले. जनतेने मतपेटीतून खोटी आश्वासने देणाºयांना धडा शिकविल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर ते गोंदिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते. अग्रवाल म्हणाले, ३४७ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११६, राष्टÑवादी काँग्रेस ७३, अपक्ष १२ आणि शिवसेना समर्थीत ४ सरपंच निवडून आले. तर भाजपला केवळ १३९ सरपंच निवडून आणता आले. काँग्रेस आणि राष्टÑवादी समर्थीत सरपंचाची बेरीज केल्यास १८९ ग्रामपंचायतीवर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली आहे. तर भाजप आणि शिवसेनेचे १४३ सरपंच निवडून आले. याचाच अर्थ ग्रामीण भागातील जनता आता सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झाली आहे.वाढती महागाई आणि जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचाच रोष ग्रामीण भागातील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे अग्रवाल म्हणाले. भाजपा केवळ सोशल मिडियावर खोटी आकडेवारी टाकून जनतेची दिशाभूल करित असल्याचा आरोप केला. मात्र जनतेने भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे जनता भाजपा सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, ज्या विश्वासाने मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेत भाजपा उमेदवारांना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांचा मोहभंग झाला. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये सरकारप्रती रोष असल्याचे सांगितले.लहीटोला ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडातालुक्यातील लहीटोला येथील ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस समर्थीत पॅनल तयार करुन लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. सरपंचपदी दिनेश तुरकर निवडून आले. लहीटोला येथे निवडून आलेल्या उमेदवारांनी तुरकर यांच्या नेतृत्त्वात आमदार गोपालदास अग्रवाल यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, क्रितीलाल नागपुरे, देवकला चुलपार, लक्ष्मीचंद चचाने, सिंधू मेश्राम, केशरबाई गौरखंडे, शैलेश सहारे, सागणबाई चुलपार उपस्थित होते.