गोंदिया : नवेगावबांध पोलीस ठाणे परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारच्या पहाटे जनावरांना कत्तलखान्यात नेणारे तीन ट्रक पकडून नवेगावबांध पोलिसांच्या स्वाधीन केले. या तीन वाहनातून ५८ जनावरांची सुटका करण्यात आली. तर ६ जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण नावडकर व त्यांच्या चमूने सदर कारवाई केली. महिद्रा पिकअप एमएच ३०/एबी-२५९८ मध्ये ११ बैल डांबून वाहतूक करणाऱ्या आशिफ मोहम्मद खा पठाण (३६) व अब्दुल मोबीन अब्दुल वहीद (२०) दोन्ही रा. मूर्तीजापूर अकोला यांना नवेगावबांध येथील टी-पार्इंट येथे अटक केली. पहाटे ३.३० वाजता ते या वाहनात जनावरे डांबून वाहतुक करीत होते. पकडलेल्या वाहनाची किंमत २ लाख तर जनावरांची किंमत ५० हजार सागितली जाते. सदर आरोपीवर प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) सह कलम ६, ९ महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा, ८३, १७७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्री २.३० वाजता ट्रक एमएच ३०/एपी-१५५६ व एमएच ३१/एपी-७१४४ या दोन वाहनांमध्ये ४५ बैल व दोन रेडे असे ४७ जनावरे डांबून वाहतूक करीत असताना चौघांना अटक करण्यात आली. त्या जनावरांची किंमत ३ लाख ७५ हजार तर दोन वाहनांची किंमत १ लाख रुपये सांगीतली जाते. या प्रकरणात आरोपी इमरान अजित खा पठान (३६), सहजहा खान किस्मत उल्लाखा पठान (२४) दोन्ही रा. मूर्तीजापूर, मोबीन गणी शेख (२८) व विलास निळू वरठी (३०) दोन्ही रा. अड्याळ पवनी जि.भंडारा यांना अटक केली. सदर आरोपीवरही प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) सह कलम ६, ९ महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा, ८३, १७७, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)'
कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे ट्रक पकडले
By admin | Published: September 13, 2014 1:59 AM